Homeताज्या बातम्या

माळशिरस तालुक्यात भीषण अपघात; मालवाहू वाहन विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू, ६ गंभीर जखमी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. एक भाविकांचे मालवाहू वाहन रस्त्याशेजारील विहिरीत कोसळल्यान

नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ‘निवडक’ भेटींची जोरदार चर्चा; लोकप्रतिनिधींना डावलून गुत्तेदारांशीच जवळीक?
नांदेड विभागात रेल्वेची धडक विशेष तिकीट तपासणी मोहीम; १,१५५ प्रकरणांमधून ५.८६ लाखांचा महसूल वसूल
राजहंस दूध संघात १३५० किलोवॅटचा भव्य सौरऊर्जा प्रकल्प; प्रतिदिन ५,२२० वीज युनिटची होणार निर्मिती – बाळासाहेब थोरात
Malshiras Well Accident: 14 Dead in Pickup Vehicle Plunge

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. एक भाविकांचे मालवाहू वाहन रस्त्याशेजारील विहिरीत कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तांदुळवाडी गावाजवळील म्हसवड-पंढरपूर मार्गावर ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन काही भाविक आपल्या गावाकडे परतत असताना त्यांचे वाहन अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि रस्त्यालगत असलेल्या एका उघड्या विहिरीत कोसळले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. विहिरीत पडलेले वाहन बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्रशासनाकडून अपघाताची संपूर्ण माहिती घेतली जात असून बाधित कुटुंबांना तातडीने मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. तसेच, संबंधित विहिरीला आवश्यक सुरक्षा कठडा होता की नाही, याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, स्थानिक आमदार उत्तम जानकर यांनी घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती देत ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन पुरुष या अपघातातून सुखरूप बचावले असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार राम सातपुते यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आणि विहिरींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत सखोल चौकशीची मागणी केली. या भीषण अपघातामुळे ग्रामीण भागातील रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरी, सुरक्षा कठडे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस आणि प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

COMMENTS