Homeताज्या बातम्याबीड

आंबेडकरांनी उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हक्क व अधिकार मिळवून दिले-किसन तांगडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिल

जिल्हा परिषदेतील अतिरिक्त कामकाज नावाखाली चालणारा प्रतिनियुक्तयांचा बाजार उठवला !डॉ. गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश
सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत यश
पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. या विचारातून देशातील तमाम उपेक्षित समाजबांधवांना आपल्या हक्क व अधिकारांसाठी आवाज उठविण्याची आणि लढण्याची ताकद मिळाली, असे प्रतिपादन रिपाइंचे बीड तालुकाध्यक्ष किसन तांगडे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ताडसोन्ना, नाळवंडी, जिरेवाडी, आहेर वडगाव, लिंबारुई, पिंपळनेर, बेलापुरी आणि चिंचोली माळी येथे आयोजित कार्यक्रमांत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना तांगडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता आणि भेदभावाविरोधात ‘मूकनायक’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून लेखन करत उपेक्षित समाजाला आपल्या अधिकारांसाठी जागृत केले. आंबेडकरी विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून आंबेडकरांना अपेक्षित असलेली चळवळ अधिक गतिमान करण्याची जबाबदारी रिपाइं कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. किसन ढोकणे, प्रा. आनंद मोरे, भाऊसाहेब कांबळे, रामेश्वर खळगे, प्रा. फुलचंद लुचारे, देवानंद वाघमारे, नवनाथ डोळस, अमोल डावकर, कचरू डावकर, कैलास गायकवाड, किसन गायकवाड, विशाल सिरसट, नितीन सिरसट, अनिल सिरसट, मसु जाधव, अमोल जाधव, श्रीमंत जाधव, विशाल गव्हाणे, राहुल कांबळे, दयानंद उबाळे, उषाताई वडमारे, राम डोळस, नितीन वडमारे, पोपट वडमारे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS