Homeताज्या बातम्या

सुरज परमार आत्महत्येची एसआयटी चौकशी करा – खासदार राऊत

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातले बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप करत या प्रकरणाची एस

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवला
सत्तेवर बसलेल्या सरकारला लोकशाही पध्दतीने खाली खेचु – संजय राऊत  
अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातले बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ही असली मागणी हा अत्यंत केविलवाणा प्रकार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावे आहेत. ती नावे कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ते रविवारी (25 डिसेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते. हिंमत असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावा, असं आव्हानच संजय राऊत यांनी सरकारला दिलं आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिले. काल आमच्या अरविंद सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर एक डायरी सापडली आहे. त्या डायरीत जी काही सांकेतिक नावे आहेत. कुणाची आहेत आम्हाला माहीत आहेत. लावा याची एसआयटी, असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे. एसआयटी सुरज परमारच्या डायरीवर व्हायला पाहिजे. करणार का? नाही. एसआयटी फक्त आमच्यावर होते. इतके सूडबुद्धीने वागणारे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात आले नव्हते, असा हल्ला राऊत यांनी चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीत जातात. त्यावरूनही राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. शिंद-फडणवीस यांचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे त्यांना वारंवार दिल्लीत जावे लागत असेल. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख तिकडे आहेत. ते जातील. त्यांना तिथूनच आदेश घ्यावे लागतात, असा चिमटा त्यांनी काढला. दिशा सालियन प्रकरण इंटरपोलकडे जरी दिले तरी हरकत नाही. ज्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही ते महाराष्ट्रच्या विधानसभेत का काढले जातायत?, असा सवाल त्यांनी केला.

COMMENTS