Homeताज्या बातम्याशहरं

डॉ. अमोल कोल्हे यांना ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान दुखापत

कराड प्रतिनिधी - अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे जखमी झाले आहेत. शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगावेळी घोड्या

मुलांना विष देत जोडप्याची आत्महत्या
पुणे शहरात स्वाईन फ्लू,निमोनिया, डेंग्यू यांची वाढतेय साथ, पुणेकर त्रस्त
सुनील तटकरे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष

कराड प्रतिनिधी – अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे जखमी झाले आहेत. शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगावेळी घोड्यावर बसून एन्ट्री घेत असतानाच अमोल कोल्हे यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचे या महानाट्याचे पुढील सर्व प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली आहे. दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने आजचा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. कराडमधील कल्याणी मैदानावर 28 एप्रिलपासून ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. कालच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. पाठीत कळ आल्याने त्यांना तात्काळ घोड्यावरून उतरवण्यता आले. मात्र त्या परिस्थितीतही डॉ. कोल्हे यांनी वेदनाशामक औषधे घेऊन चेहऱ्यावर दुखापतीचा भाव उमटू न देता जिद्दीने प्रयोग सादर केला. मात्र, डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिल्याने कोल्हे यांचे उर्वरीत प्रयोग रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली.

COMMENTS