Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओंकार शुगर ग्रुपकडून १७ साखर कारखान्यांना पुनर्जीवन; पेमेंटबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका ; बोत्रे पाटील

श्रीगोंदा : बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुपने महाराष्ट्रासह तेलंगणा व कर्नाटक या तीन राज्यांतील अडचणीत सापडलेले अथवा बंद पडलेले तब्बल १७ साखर कारखाने पुन्हा सुरू करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. या उपक्रमातून सुमारे ११ लाख ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि ऊस तोडणी मजुरांना आर्थिक न्याय मिळाल्याचा दावा ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी केला आहे. ओमराजे बोत्रेपाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, या १७ साखर कारखान्यांमार्फत आतापर्यंत सुमारे ७५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना सुमारे १,८३० कोटी रुपयांचे ऊसबिल अदा करण्यात आले असून, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांना सुमारे ७१० कोटी रुपये देण्यात आले आहेत. या प्रक्रियेत जवळपास १८ हजार साखर कामगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गाळप हंगामात सुमारे ६ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही प्रमाणात ऊसबिल थकबाकी राहिल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, केवळ एका महिन्याचे ऊसबिल बाकी असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. “शेतकरी व ऊस वाहतूकदारांचे सर्व देयक वेळेत अदा केले जाईल. कुणाचाही एक रुपयाही थकवला जाणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या गाळप हंगामासाठी ओंकार शुगर ग्रुपने मोठी योजना आखली असून २१ साखर कारखाने चालवून सुमारे १ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. यामधून सुमारे ७ हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार पेट्रोल-डिझेलमध्ये ३३ टक्के इथेनॉल मिश्रणास परवानगी मिळणार असल्याने, ग्रुपने मोलॅसेस साठवून ठेवले असून त्यातून सुमारे ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. दरम्यान, राज्यातील सुमारे १४० खाजगी व सहकारी साखर कारखान्यांकडे एफआरपीपोटी सुमारे २,१०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा उल्लेख करत, ओंकार शुगर ग्रुपवर २ ते ३ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याच्या सोशल मीडियावर पसरत असलेल्या बातम्या पूर्णपणे अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “अशा अफवांवर शेतकरी व संबंधितांनी विश्वास ठेवू नये,” असे आवाहनही त्यांनी केले. शेवटी, “शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देणे आणि ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांच्या प्रगतीसाठी काम करणे हेच बाबुराव बोत्रेपाटील यांचे ध्येय आहे,” असेही ओमराजे बोत्रेपाटील यांनी सांगितले.

नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करा : आ. रोहित पवारांच्या सूचना ; जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक
विधानपरिषदेसाठी विवेक कोल्हेंचे नाव येताच कोपरगावमध्ये जल्लोष
कर्जत नगरपंचायतीत प्रा.सतीश पाटील गटनेतेपदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; १५ पैकी ११ नगरसेवकांचा पाठिंबा

श्रीगोंदा : बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुपने महाराष्ट्रासह तेलंगणा व कर्नाटक या तीन राज्यांतील अडचणीत सापडलेले अथवा बंद पडलेले तब्बल १७ साखर कारखाने पुन्हा सुरू करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. या उपक्रमातून सुमारे ११ लाख ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि ऊस तोडणी मजुरांना आर्थिक न्याय मिळाल्याचा दावा ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी केला आहे.

ओमराजे बोत्रेपाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, या १७ साखर कारखान्यांमार्फत आतापर्यंत सुमारे ७५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना सुमारे १,८३० कोटी रुपयांचे ऊसबिल अदा करण्यात आले असून, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांना सुमारे ७१० कोटी रुपये देण्यात आले आहेत. या प्रक्रियेत जवळपास १८ हजार साखर कामगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गाळप हंगामात सुमारे ६ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही प्रमाणात ऊसबिल थकबाकी राहिल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, केवळ एका महिन्याचे ऊसबिल बाकी असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. “शेतकरी व ऊस वाहतूकदारांचे सर्व देयक वेळेत अदा केले जाईल. कुणाचाही एक रुपयाही थकवला जाणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येत्या गाळप हंगामासाठी ओंकार शुगर ग्रुपने मोठी योजना आखली असून २१ साखर कारखाने चालवून सुमारे १ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. यामधून सुमारे ७ हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार पेट्रोल-डिझेलमध्ये ३३ टक्के इथेनॉल मिश्रणास परवानगी मिळणार असल्याने, ग्रुपने मोलॅसेस साठवून ठेवले असून त्यातून सुमारे ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

दरम्यान, राज्यातील सुमारे १४० खाजगी व सहकारी साखर कारखान्यांकडे एफआरपीपोटी सुमारे २,१०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा उल्लेख करत, ओंकार शुगर ग्रुपवर २ ते ३ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याच्या सोशल मीडियावर पसरत असलेल्या बातम्या पूर्णपणे अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “अशा अफवांवर शेतकरी व संबंधितांनी विश्वास ठेवू नये,” असे आवाहनही त्यांनी केले.

शेवटी, “शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देणे आणि ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांच्या प्रगतीसाठी काम करणे हेच बाबुराव बोत्रेपाटील यांचे ध्येय आहे,” असेही ओमराजे बोत्रेपाटील यांनी सांगितले.

COMMENTS