बेलापूर : येथील सुरेश घाणे यांचे सुपुत्र अक्षय घाणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर व्यवस्थापक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्

बेलापूर : येथील सुरेश घाणे यांचे सुपुत्र अक्षय घाणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर व्यवस्थापक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार दीपक काळे यांच्या पुढाकारातून क. जे. सोमैया विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला.
यावेळी बोलताना रणजित श्रीगोड यांनी सांगितले की, घाणे कुटुंबीयांनी परिश्रमाच्या जोरावर प्रगतीची वाटचाल केली आहे. अक्षय घाणे यांची निवड ही सामान्य जनतेसाठी प्रेरणादायी ठरणारी असून त्यांच्या यशाचा सन्मान समाजातील तरुणांना दिशा देणारा आहे.
या प्रसंगी दीपक काळे यांनी अक्षय घाणे यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचाही सन्मान केला. कार्यक्रमास माजी प्राध्यापक माघवराव पगारे, एकनाथ ओहोळ, रंजना घाणे, नंदिनी काळे आदी उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे यांनीही अक्षय घाणे यांचा सत्कार केला. दरम्यान, अक्षय घाणे यांची २०२४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त मुख्य परीक्षेतून महसूल सहाय्यक पदावरही निवड झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS