Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतात गळफास घेऊन आत्महत्या

सोनई :  नेवासा तालुक्यातील माडेगव्हाण शिवारात एका 62 वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घट

नागलवाडी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
नाळवंडी बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून ‘महात्मा फुले चौक’ची स्थापना
कोमल भूतांबरे यांची पोलीस खात्यात निवड 
Farmer Suicides in Tamil Nadu Rose 6% During 2019: NCRB | NewsClick

सोनई :  नेवासा तालुक्यातील माडेगव्हाण शिवारात एका 62 वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भागवत नारायण शिरसाठ (वय 62, रा. माडेगव्हाण, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी  7 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी संजय भागवत शिरसाठ (वय 41) यांनी सोनई पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.  

COMMENTS