Homeताज्या बातम्या

उमरी फाटा येथे कर्जमाफी पीक विम्याचे आंदोलनकुक्कडगाव, राक्षसभवन येथे शेतकरी बैठक

सरकारने कर्जमाफीच्या घोषणेमध्ये अनेक अटी शर्ती टाकल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन अतिवृष्ट

फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेकडून होळीबीड, आंबेजोगाई, परळीसह जिल्हाभरात निदर्शने
आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट रस्ते, पूल आणि न्यायालयासाठी निधीची मागणी
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?



सरकारने कर्जमाफीच्या घोषणेमध्ये अनेक अटी शर्ती टाकल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तात्काळ पिक विमा देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी हक्क मोर्च्याच्या वतीने दि. 14 जुलै रोजी  उमरद खालसा फाटा (उमरी फाटा)येथे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राक्षस भुवन व कुक्कडगाव येथील बैठकीस शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सरकारने कर्जमाफी टाकलेल्या अटी व शर्ती रद्द कराव्यात, तसेच मागील वर्षी अतिवृष्टी मध्ये शेतकर्‍याला पीक विम्याच्या माध्यमातून हेक्टरी 17 हजार रुपये मदत देऊ अशी घोषणा केली असतांना बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पिक विमा देण्यात आलेला नाही सरकारने कर्जमाफीतील अटी व शर्ती काढून शेतकर्‍यांना हेक्टरी 17 हजार रुपये पिक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा, या मागणी करिता बीड – पिंपळनेर रोडवरील उमरी फाटा ( उमरद खालसा) येथे मंगळवार दि. 14 जुलै रोजी शेतकरी आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांनी दिली. दरम्यान कर्जमाफी व पिक विमा आंदोलनाकरिता शेतकर्‍यांच्या गावोगावी बैठका सुरू आहेत. बीड तालुक्यातील राक्षसभुवन, व कुक्कडगाव या ठिकाणी शेतकरी हक्क मोर्चाच्या उमरी येथील आंदोलनाकरिता बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीत शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या बैठकीस शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, राजेश गाडे, रोहिदास मस्के, नंदू शिंदे, दीपक जाधव, राजेभाऊ कुठे महाराज देविदास वाणी, बंडू शिंदे, रामचंद्र पाटील,उमेश मस्के, आसाराम शिंदे,शंभू देव मस्के, बालासाहेब गाडे, मुंजाजी लोणकर, चंदू नवले ,आत्माराम प्रभाळे ,यशवंत कदम,अशोक लोणकर, महादेव मस्के, सुभाष मस्के, भागवत लोणकर, आदिनाथ लोणकर, बजरंग लोणकर, भीमराव नवले , नवनाथ लोणकर,  दिनकर मस्के, दिलीप पांचाळ, अरुण डफळ,  लिंबाजी लोणकर, संतराम लोणकर, मनोहर मस्के, मोहन मस्के, श्रीराम मस्के, दिनकर गाडे, कल्याणराव मस्के, करण लोणकर, मदन लोणकर, भागवत पांचाळ,  ज्ञानोबा मस्के सह आणि उपस्थित होते.

COMMENTS