Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणीटंचाई संयुक्त पथकाला मोतीबिंदू झालाय का ?

तलावाच्या भिंतीवरील झाडे दिसेना-डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 3 अंतर्गत साठवण तलावाच्या भिंतीवर मोठमोठाली झाडे, झुडपे असून त्यामुळे तलावाच्या

नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री
 आमदार देवेंद्र भुयार यांनी शंकर पटावर हाकलली बैल जोडी
होळीनिमित्त रंग व पिचकारी खरेदीसाठी नागरिकांची लगबग 

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 3 अंतर्गत साठवण तलावाच्या भिंतीवर मोठमोठाली झाडे, झुडपे असून त्यामुळे तलावाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असुन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून संयुक्त पथकाला मोतीबिंदू झालाय का? असा प्रश्न पडला आहे.त्यामुळेच     संबंधित प्रकरणात आवश्यक उपाययोजना करण्यात येऊन संबंधित अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी तसेच मान्सून पुर्व दुररस्तीची कागदोपत्रीच बोगस कामे दाखवून बीले उचलणारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड , कार्यकारी अभियंता पाटबंधारे बीड विभाग क्रमांक 3 यांच्या मार्फत जलसंपदा मंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
हिंदी महासागरात निर्माण झालेल्या अल – निनो प्रभाव मान्सूनवर होण्याची शक्यता असुन आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी जिल्हाप्रशासनाने आराखडे तयार केले असून पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी विद्युत मोटारी अथवा अन्य साधनांद्वारे करण्यात येणारा अवैध पाणी रोखण्यासाठी संबंधित पाटबंधारे विभाग अधिकारी, कर्मचारी, गटविकास अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व महावितरणचे कर्मचारी यांची संयुक्त पथके सर्व तहसीलदार यांनी स्थापन करून पाणी उपस्यावर प्रतिबंध घालण्यात यावा व अहवाल कार्यालयास सादर करण्यात यावा म्हटलं आहे. परंतु याचवेळी साठवण तलावाच्या दगडी पिचिंग केलेल्या भिंतीवर मोठमोठाली झाडे उगवली असुन त्याकडे पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असुन तलावाच्या भिंतीला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच लघु सिंचन तलावाच्या अंतर्गत शिर्ष भागातील पावसाळा पुर्व विविध कामे कागदोपत्रीच केल्याचे दाखवून निधीचा अपहार केला जात असुन संबंधित प्रकरणात लेखी तक्रारी नंतर सुद्धा कारवाई केली जात नसुन संबंधित प्रकरणात वरिष्ठ स्तरावरून चौकशी व कारवाई करण्यात यावी. बीड तालुक्यातील मौजे.मसेवाडी  लघु सिंचन तलाव अंतर्गत शिर्ष भागातील सन 2019 मधील पावसाळा पुर्व विविध दुरुस्ती म्हणून 2 लाख 67 हजार 300 रूपये आणि मौजे.गोलंग्री ता.जि.बीड येथील गोलंग्री लघु सिंचन तलाव अंतर्गत शिर्ष भागातील सन 2019 मधील पावसाळा पुर्व विविध दुरुस्ती कामे नावाने 2 लाख 72 हजार 250 रूपये निधीचा बोगस कामे दाखवून अपहार केल्याप्रकरणी दि.26 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक 3 बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना तक्रार केली होती परंतु कोणतीही चौकशी न करताच प्रकरण दडपण्यात आले म्हणून संबंधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी.अशी मागणी केली आहे.

COMMENTS