Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत राष्ट्रवादीचा ईडी कार्यालयासमोर निषेध मोर्चा

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना ईडीने सोमवारी मुंबई येथील कार्यालयात बोलविल्याने

सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या पीएची तडकाफडकी बदली
अवघ्या दहा तासात मोटरसायकल चोरास अटक
देयके प्रमाणक नमुन्यासह देयकांवर नगराध्यक्षांच्या बेकायदेशीररीत्या स्वाक्षरी; विरोधी पक्षनेत्या दीपाली शेळके यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना ईडीने सोमवारी मुंबई येथील कार्यालयात बोलविल्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्तपणे आलेल्या 5-7 हजार कार्यकर्त्यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिसरात ईडी विरोधात तीव्र निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ’साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्‍वास व्यक्त केला. कोण आला रे कोण आला, पवारसाहेबांचा वाघ आला. सरकार हमसे डरती, ईडी को आगे करती है। जयंत पाटील आप संघर्ष करो, असे म्हणत बॅनर घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
माजी मंत्री आ. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात जाणार होते. त्यामुळे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कार्यकर्ते सकाळी 7 पासूनच मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर जमा झाले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आ. जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बाजाविल्याने ईडीचा तीव्र शब्दात तीव्र निषेध व्यक्त आम्ही सर्वजण आ. जयंत पाटील यांच्या सोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
आ. जयंत पाटील हे सकाळी 11 वाजता पक्ष कार्यालयात आले. त्यांच्या समवेत माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड, युवकांचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आ. पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. आ. जयंत पाटील ईडी कार्यालयाकडे गेल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
माजी आ. मिलिंद कांबळे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, ठाण्याचे आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, अ‍ॅड. चिमनडांगे, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, विनायक पाटील, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, पिरअली पुणेकर, संजय बजाज, सुरेश पाटील, मैमुद्दीन बागवान, कामगार नेते शंकरराव भोसले, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, माजी सभापती अ‍ॅड. विश्‍वासराव पाटील, आनंदराव पाटील, खंडेराव जाधव, महिला राष्ट्रवादीच्या सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, रोझा किणीकर, शैलजा पाटील, बाळासाहेब पवार, शिवाजीराव मगर, हणमंत देशमुख, अनिता सगरे, दत्ताजी पाटील, रोहित पाटील, सतिश पाटील, रणजित पाटील, अतुल पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्त्यांनी आ. पाटील ईडी कार्यालयातून बाहेर येईपर्यंत रस्त्यावर ठाण मांडले होते. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

COMMENTS