Homeताज्या बातम्या

नातेवाईकांवर कारवाई, पण तंबाखू खाऊन ड्युटी करणार्‍या कर्मचार्‍यावर मेहरबानी का?

बीड जिल्हा रुग्णालयात नियम आणि शिस्तीच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांवर कारवाई केली जाते, दंड आकारला जातो, समज दिली जाते. मात्र त्याच रुग्णाल

देगलूर नाका परिसरात मेडिकल नशेखोरांचा अड्डा?अल्पवयीनांना जाळ्यात ओढण्याचा गंभीर आरोप, प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईची मागणी
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले
नागरी रुग्णालय अंबाजोगाई येथे बिन टाका शस्त्रक्रिया शिबिरात 35 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
तंबाखू कर्करोग,World Cancer Day: सावधान, तंबाखू रूप बदलते आहे... - alert,  the appearance of tobacco ... - Maharashtra Times



बीड जिल्हा रुग्णालयात नियम आणि शिस्तीच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांवर कारवाई केली जाते, दंड आकारला जातो, समज दिली जाते. मात्र त्याच रुग्णालयातील एका कर्मचार्‍याचा तोंडात तंबाखू-गुटखा ठेवून ड्युटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही प्रशासन शांत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित कर्मचारी गळ्यात ओळखपत्र नसताना आणि तोंडात तंबाखू ठेवून रुग्णालयात वावरत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. रुग्णालय परिसर तंबाखूमुक्त असल्याचे फलक लावले जातात, जनजागृती केली जाते, पण कर्मचारीच नियमांचे उल्लंघन करत असतील तर या फलकांचा आणि नियमांचा उपयोग तरी काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडिओ समोर येऊन अनेक तास उलटले तरी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आणि रुग्णांच्या नातेवाईकांवर तत्परतेने कारवाई करणारे प्रशासन स्वतःच्या कर्मचार्‍यांच्या बाबतीत मात्र एवढे नरम का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर एखाद्या नातेवाईकाने नियम मोडला तर त्याच्यावर त्वरित कारवाई होते. मग रुग्णालयाची प्रतिमा मलीन करणार्‍या कर्मचार्‍याबाबत एवढी उदार भूमिका का? संबंधित कर्मचार्‍याला कोणाचे पाठबळ आहे का? की व्हायरल व्हिडिओ असूनही प्रशासन डोळेझाक करण्याचे धोरण अवलंबत आहे? आरोग्य विभागाचे अधिकारी वारंवार तंबाखूमुक्त परिसराच्या घोषणा करतात. मात्र स्वतःच्या रुग्णालयात कर्मचारी तंबाखू खात असल्याचे व्हिडिओ समोर येत असतील आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नसेल तर या घोषणांचा अर्थ काय उरतो? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जिल्हा शल्यचिकित्सकांनी आता मौन सोडून स्पष्ट भूमिका घ्यावी. संबंधित कर्मचार्‍याची चौकशी करून तो दोषी आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. अन्यथा प्रशासनाची कारवाई ही निवडक लोकांपुरतीच मर्यादित असल्याचा संदेश समाजात जाईल. सीएस साहेब, नातेवाईकांवर कारवाई करताना नियम आठवतात, मग तंबाखू खाऊन ड्युटी करणारा कर्मचारी दिसत नाही का? की नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत? असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS