Homeताज्या बातम्या

नेकनूर येथील स्त्री रुग्णालयात अखेर सोनोग्राफी मशीन उपलब्धसचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

येथील स्त्री रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला सोनोग्राफी मशीनचा प्रश्न अखेर सुटला आहे. रुग्णालयात नवीन सोनोग्राफी मशीन दाखल झाल

देगलूरच्या रुग्णालयासाठी 22.97 कोटींचा निधी मंजूर; 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारणार
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले
माझी बदली करा, मी खूप त्रासात आहे… आरोग्यमंत्र्यांचे पाय धरून ढसाढसा रडली महिला नर्स; जोधपूरमधील भावुक व्हिडिओ व्हायरल!


येथील स्त्री रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला सोनोग्राफी मशीनचा प्रश्न अखेर सुटला आहे. रुग्णालयात नवीन सोनोग्राफी मशीन दाखल झाली असून, लवकरच ती रुग्णांच्या सेवेत सुरू होईल. नेकनूर चे उपसरपंच सचिन शिंदे यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे  यश आले आहे.नेकनूर आणि परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, सोनोग्राफी सुविधा नसल्यामुळे विशेषतः गरोदर माता आणि गरजू महिला रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन महागड्या चाचण्या कराव्या लागत होत्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची यामुळे मोठी आर्थिक परवड होत होती. आता शासकीय रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील महिलांचे पैशांचे आणि वेळेचे मोठे नुकसान टळणार आहे.सोनोग्राफी मशीन रुग्णालयात दाखल झाली असून, तिच्या उभारणीचे आणि तांत्रिकदृष्ट्या काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांतच अधिकृतपणे रुग्णांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणे सुरू होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उपसरपंच सचिन शिंदे यांच्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आणि लोकोपयोगी कार्याबद्दल नेकनूर परिसरातील नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.

COMMENTS