Homeताज्या बातम्या

‘तनपुरे’ कारखान्याच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या; देवळाली प्रवरा येथील दुर्दैवी घटना

देवळाली प्रवरा : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूंजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्

शेवगाव पोलिसांची धडक कारवाईअवैध वाळू वाहतूक व गोमांस विक्रीवर छापे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पत्रकारांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; शेवगाव पोलीस ठाण्यात पत्रकार बांधवांचे कारवाईसाठी निवेदन
सासरच्या छळाला कंटाळून देवळाली प्रवरा येथील विवाहितेची पुण्यात आत्महत्या; पतीसह दोघे गजाआड

देवळाली प्रवरा : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूंजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कारखाना बंद पडल्याने निर्माण झालेली आर्थिक विवंचना, रोजगाराचा अभाव आणि थकीत वेतनाचा गंभीर प्रश्न यांमुळे ही घटना घडल्याची चर्चा असून, यामुळे कारखाना परिसरासह कामगार वसाहतीत मोठी शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद असल्याने शेकडो कामगार तीव्र आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. नियमित उत्पन्न बंद झाल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. कामगारांवर कर्ज, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविण्याचे मोठे ओझे असल्याने अनेक कर्मचारी सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.

याच बिकट परिस्थितीतून बाळासाहेब तारडे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले. विशेष म्हणजे, तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीत घडलेली ही दुसरी आत्महत्येची घटना असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे कारखाना बंद पडल्याने कामगारांच्या निर्माण झालेल्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांची भीषण तीव्रता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

कामगार हतबल; अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत कारखान्याकडील थकीत वेतनाचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने अनेक कामगार कुटुंबे देशोधडीला लागली असल्याचा आरोप स्थानिक कर्मचाऱ्यांनी केला आहे. “कारखाना बंद पडला आहे, नवीन रोजगार मिळत नाही आणि हक्काचा थकीत पगारही मिळेनासा झाला आहे. अशा परिस्थितीत कामगार अत्यंत हतबल झाले असून प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा,” अशी आक्रमक व तीव्र भावना कामगारांमधून व्यक्त होत आहे.

COMMENTS