Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड पोलिसांचे माणुसकीचे दर्शन; रस्त्यावर भटकणार्‍या असहाय्य मातेला व दोन चिमुरड्यांना मिळाला सुरक्षित आधार

बीड : कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच समाजातील निराधार, असहाय्य घटकांना आधार देण्याची जबाबदारीही पोलीस यंत्रणा पार पाडत असल्याचे प्रेरणादायी उदा

अमरावती हादरले! १८० तरुणींचे शोषण करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या
गडचिरोली पोलिसांची कारवाई! बनावट नोटा छापणाऱ्या ‘हाय-टेक’ टोळीचा पर्दाफाश, ४ आरोपी गजाआड
गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘निर्णायक प्रहार’; 22 गुंडांवर एमपीडीए, पाच टोळ्यांवर मोक्काची टांगती तलवार

बीड : कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच समाजातील निराधार, असहाय्य घटकांना आधार देण्याची जबाबदारीही पोलीस यंत्रणा पार पाडत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण बीड शहरात सोमवारी (दि. 4 मे) घडले. बीड शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे रस्त्यावर भटकत असलेल्या एका महिलेसह तिच्या दोन लहान मुलींना तातडीने सुरक्षित निवारा मिळाला.
सोमवारी दुपारी बीड शहरातील मुख्य रस्त्यावर 28 वर्षीय महिला आपल्या 5 आणि 2 वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींसह अत्यंत अस्वस्थ अवस्थेत फिरत असल्याचे दिसून आले. कडक उन्हात, हातात लहान मुलांना घेऊन ती महिला दिशाहीनपणे रस्त्यावर भटकत होती. हे दृश्य पाहून वाहतूक शाखेतील अंमलदार सखाराम घोलप, वसिम शेख आणि दत्ता कदम यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत चौकशी केली. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेने सांगितले की, घरगुती वादातून ती घर सोडून बाहेर पडली असून, सध्या तिच्याकडे कोणताही निवारा नाही. त्यामुळे ती आपल्या दोन लहान मुलींसह रस्त्यावर आश्रयाच्या शोधात होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अंमलदारांनी तात्काळ वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि दिलीप कुमार खेडकर यांना माहिती दिली. माहिती मिळताच सपोनि खेडकर यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. असुरक्षित परिस्थितीत असलेल्या महिला व लहान मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी तातडीने निर्णय घेतला. संबंधित महिलेला पोलीस वाहनातून जिव्हाळा बेघर निवारा केंद्र येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले. निवारा केंद्र प्रशासनाशी संपर्क साधून महिला व तिच्या दोन्ही मुलींसाठी राहण्याची, भोजनाची आणि प्राथमिक गरजांची व्यवस्था करण्यात आली. मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. त्याचबरोबर या प्रकरणाची अधिकृत माहिती बीड शहर पोलीस ठाण्याला लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जालना जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याशी समन्वय साधला जात आहे. महिलेला योग्य न्याय व संरक्षण मिळावे यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. या घटनेबाबत बोलताना सपोनि दिलीप कुमार खेडकर यांनी सांगितले की, पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाला सुरक्षितता आणि आधार देण्यासाठीही तत्पर असते. या महिलेला आणि तिच्या मुलींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे हे आमचे कर्तव्य होते. या घटनेनंतर बीड शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. कडक उन्हात निराधार अवस्थेत असलेल्या आई आणि मुलींना दिलेला आधार हा पोलिसांच्या सामाजिक भूमिकेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. ही घटना केवळ एक कारवाई नसून, पोलिसांच्या माणुसकीचे आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण म्हणून पुढे आली आहे.

COMMENTS