Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज तालुक्यात अल्पवयीन मेव्हूणीवर लैंगिक अत्याचार व बलात्कार केलेल्या आरोपीविरुद्ध पोक्सो व बलात्काराचा गुन्हा नोंद

केज : तालुक्यातील एका खेडेगावातील मामा, मामीच्या गावाला भाच्चा हा,पाव्हुणा म्हणुन आला, अन 10 वर्षे वयाच्या अल्पवयीन मेव्हूणीवर तीची छेडछाड करून त

महिला पोलिस अधिकार्‍याला 28 लाखांची लाच घेताना अटक
अंगणवाडी मदतनीस वर 1 वर्षांपासून अत्याचार
मुंबईत तस्कराचा पोलिसांवर हल्ला

केज : तालुक्यातील एका खेडेगावातील मामा, मामीच्या गावाला भाच्चा हा,पाव्हुणा म्हणुन आला, अन 10 वर्षे वयाच्या अल्पवयीन मेव्हूणीवर तीची छेडछाड करून तिच्यावर लैंगिक अत्याचार व बलात्कार करून गेल्याची घटना उघडकीस आली आसून मामीच्या फिर्यादीवरून आरोपी भाच्याविरुद्ध युसूफवडगाव पोलिसात मंगळवारी ( दि. 5 ) रात्री सव्वा नव वाजता पोक्सो व बलात्काराचा गून्हा नोंद करण्यात आला आहे.
सोमवारी  ( दि. 4 ) दुपारीं धाराशिव जिल्ह्यातील इटकुर,ता. कळंब येथील 29 वर्षीय भाच्चा त्याच्या आजोळी मामा-मामीला भेटण्यासाठी आला होता. मामा व मामी हे रात्री शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले आसता घरी आसलेल्या 10 वर्षे 10 महिने 18 दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीला भाच्यासोबत घरी ठेवण्यात आले होते. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन नराधम भाच्याने सोमवारी रात्री अल्पवयीन पिडितेवर लैंगिक अत्याचार केला.आई-वडील घरी आल्यानंतर चिमुकलीने घडलेल्या प्रकारची माहिती त्यांना दिली. त्यावरून नराधम भाच्या विरुद्ध मामीने विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात  दिलेल्या फिर्यादीवरून अमर राजाभाऊ भुंगुर्डे, वय 29 वर्षे रा इतकूर ता कळंब याच्या विरुद्ध  पोक्सो व बलात्काराचा गून्हा नोंद झाला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पिडीत मुलीच्या आई, वडिलांची भेट भेटली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे  पुढील तपास करीत आहेत.
 आरोपीच्या आवळल्या मुसक्या
बलात्कारा नंतर आरोपी हा आपल्या गावी इटकुरला पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा माग काढून पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल महेश कोकाटे आणि सोहेल पठाण यांनी आरोपीला मंगळवारी (दि. 5 ) रात्री धाराशिव जिल्ह्यातील इटकुर येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी त्याला केज न्यायालया समोर हजर केले आसता केज न्यायालयाने त्याला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS