Beed Crime ;  बीडमध्ये राडा ! रस्त्यावर रक्तच..

Homeताज्या बातम्याबीड

Beed Crime ; बीडमध्ये राडा ! रस्त्यावर रक्तच..

बीड प्रतिनिधी /बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. जुन्या वादात

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; महिलांचे मोबाईल पळवणारी टोळी दोन तासांत गजाआडतीन महिलांना लक्ष्य करणार्‍या अट्टल चोरांकडून 9 मोबाईल जप्त
परळीतील ’त्या’ मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला खूनस्थानिक गुन्हे शाखे कडून 48 तासांत आरोपी जेरबंद
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई

बीड प्रतिनिधी /
बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. जुन्या वादातून तलवार, कोयता, लोखंडी रॉड आणि दगडाने चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी कारवाई करत ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बीडच्या केज तालुक्यातील डोका गावात हाणामारीचा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसारस दोन गटात वाद उफाळून आला. विक्रम भांगे, सागर भांगे आणि त्यांच्यासोबत आणखी पाच जणांनी मिळून “तुम्ही आमच्यावर गुन्हा का दाखल केला?” या कारणावरून तक्रारदार पक्षावर हल्ला चढवला. त्यांनी धारदार शस्त्रं आणि दगड वापरत जोरदार मारहाण केली.

आरोपींनी केलेल्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी केज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच ७ आरोपींवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांकडून तपास सुरू असून, हल्लेखोर आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS