Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाकूने वार करून रॉबरी करणारा आरोपी जेरबंद; बीड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

बीड :शहरातील बसस्थानक परिसरात चाकूने हल्ला करून मोबाईल लुटणार्‍या फरार आरोपीस बीड शहर पोलिसांनी अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या घटनेमुळे

राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील लांडे खून प्रकरण

बीड :
शहरातील बसस्थानक परिसरात चाकूने हल्ला करून मोबाईल लुटणार्‍या फरार आरोपीस बीड शहर पोलिसांनी अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या घटनेमुळे काही दिवसांपूर्वी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजण्याच्या सुमारास बसस्थानकासमोरील वंदना हॉटेल परिसरात फिर्यादी उमेश सुनील पारिक (वय 30, रा. काशी नगर, जालना रोड, बीड) हे उभे असताना आरोपीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपीने चाकूने वार करत फिर्यादीच्या तोंडावर व पाठीवर मारहाण केली, ज्यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या खिशातील ओप्पो -11 कंपनीचा सुमारे 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादीने बीड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यावरून गुन्हा क्रमांक 0074/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 309(6) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण तसेच माहितीदारांचे जाळे सक्रिय करून आरोपीचा माग काढण्यात आला. या प्रयत्नांना यश मिळत अखेर विनोद मुळे (रा. भाजी मंडई, बीड शहर) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणार्‍या तसेच मारामारी व रॉबरीसारखे गंभीर गुन्हे करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसारच बीड शहर पोलिसांनी ही तातडीची कारवाई करून आरोपीस जेरबंद केले. तसेच, अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकट राम यांच्या देखरेखीखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ व पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांच्यासह पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

COMMENTS