Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

गुजरातमध्ये 2500 कोटींचा सायबर घोटाळा उघड; आत्तापर्यंत 20 बँक अधिकार्‍यांना पोलिसांनी केली अटक

राजकोट : गुजरातमधील राजकोट येथे तब्बल 2500 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा भलामोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणाने आर्थिक व्यवहारांच्या सुरक

सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
मुंबईतील भोंदू रिदम पांचाळला अटक; महापालिकेच्या गार्डनमध्ये करायचा अघोरी पूजा
मणिपूरमध्ये शस्त्र 1800 किलो अफूसह दोघे जेरबंद
गुजरात : राजकोटमध्ये 2,500 कोटी रुपयांची सायबर फसवणूक उघडकीस आली आहे

राजकोट : गुजरातमधील राजकोट येथे तब्बल 2500 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा भलामोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणाने आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. या गुन्हेगारी जाळ्यात खासगी बँकांतील काही अधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने प्रकरण अधिकच धक्कादायक ठरले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 20 बँक अधिकार्‍यांना अटक केली असून, तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकोट ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विजय गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाधाधरी येथील यस बँकेचा वैयक्तिक व्यवस्थापक मौलिक कामाणी, जामनगर येथील क्सिस बँकेचा व्यवस्थापक कल्पेश डांगरिया आणि एचडीएफसी बँकेचा वैयक्तिक बँकर अनुराग बाल्धा यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांवर संशयास्पद खात्यांची उघडझाप आणि त्यांचे व्यवस्थापन करून मोठ्या आर्थिक फसवणुकीला हातभार लावल्याचा आरोप आहे. तपासात असे उघड झाले की, आरोपी विविध बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडत आणि ती सक्रिय ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने व्यवहार करत. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना बँकांकडून येणारे इशारे टाळण्यासाठी ही खाती खास पद्धतीने चालवली जात होती. काही प्रकरणांत बनावट ओळखपत्रांच्या आधारे खाती उघडण्यात आली, तर पडताळणीची प्रक्रिया देखील हेतुपुरस्सर पूर्ण करण्यात आली, जेणेकरून संशय निर्माण होऊ नये. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम काढून ती पुढे बेकायदेशीर मार्गाने परदेशात पाठवली जात असल्याचेही समोर आले आहे. या साखळीमुळे फसवणुकीचा व्याप हजारो कोटींपर्यंत पोहोचला. पोलिसांनी आतापर्यंत या रॅकेटशी संबंधित तब्बल 85 बँक खात्यांचा मागोवा घेतला असून, सायबर गुन्हे नोंदविणार्‍या संकेतस्थळावर 535 तक्रारी नोंद झाल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या तिन्ही मुख्य आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून, यापूर्वी अटक केलेले इतर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आणखी काही बँक अधिकारी किंवा मध्यस्थ यांचा सहभाग उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे बँकिंग व्यवस्थेतील त्रुटी आणि सायबर सुरक्षेतील उणिवा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आल्या आहेत.

COMMENTS