Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवीगाळ केल्याने केला तरुणाचा खून

पुणे/प्रतिनिधी ः दोन आठवड्यांपूर्वी दारू पिऊन शिवीगाळ केल्याने एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बिबेवाडी परिसरात घडली आहे. श्रीकांत मच्

आईच्या वर्षश्राद्धातील पाचशे रुपयांची उधारी देण्यावरून भावांमध्ये वादविवाद
ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याची हत्या
राजधानीत आइसक्रीम विक्रेत्याची हत्या

पुणे/प्रतिनिधी ः दोन आठवड्यांपूर्वी दारू पिऊन शिवीगाळ केल्याने एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बिबेवाडी परिसरात घडली आहे. श्रीकांत मच्छिंद्र जाधव (वय 38, राजीव गांधी नगर, बिबबेवाडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तीन आरोपी विरोधात बिबबेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सुनील पारेकर व त्याचे दोन साथीदार (राहणार -बिबबेवाडी , पुणे) यांच्यावर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. श्रीकांत जाधव हा सामाजिक कार्यकर्ता असून त्यास दारूचे व्यसन होते. दारू पिऊन दोन आठवड्यापूर्वी त्यानी सुनील पारेकर यांच्या घरासमोर शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे सुनील पारेकर यांनी श्रीकांत जाधव यास दारू पिऊन याठिकाणी शिवीगाळ करू नको असे सांगितले त्यावरून त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी रात्री श्रीकांत जाधव दारू पिऊन बिबेवाडीतील डॉल्फिन चौकाजवळील हर्ष टेलर दुकानासमोर थांबलेला असताना, त्याचे सुनील पारेकरशी पुन्हा वाद झाले. यावेळी सुनील पारेकर व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून श्रीकांत जाधव यास दगडाने ठेचून बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत जाधव यास पोलिसांनी भारती हॉस्पिटल याठिकाणी उपचारासाठी दाखल केले. मात्र गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सदर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बिबबेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव यांनी दिला आहे. याबाबत पुढील तपासणी बिबबेवाडी पोलिस करत आहेत.

COMMENTS