Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनैतिक संबंधातून मुलांनीच जन्मदात्यांची केली हत्या

हत्येनंतर फरसाणच्या भट्टीत जाळला मृतदेह पुणे जिल्ह्यातील खेड येथील घटना

पुणे/प्रतिनिधी ः जन्मदात्या वडिलांचा खून करून दृश्यम चित्रपटाला शोभेल अशा प्रकारे दोन मुलांनीच प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना पुणे जिल्ह्याती

35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण.
पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या
मेव्हण्याकडून दाजीची डोक्यात रॉड घालत हत्या

पुणे/प्रतिनिधी ः जन्मदात्या वडिलांचा खून करून दृश्यम चित्रपटाला शोभेल अशा प्रकारे दोन मुलांनीच प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली आहे. महाळुंगे पोलिसांनी दोन तासाच्या गुन्ह्याची उखल करून दोन सख्ख्या भावांना गजाआड केले आहे.


धनंजय नवनाथ बनसोडे (वय 43, रा. निघोजे, ता. खेड) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून या प्रकरणी त्यांची मुले सुजित धनंजय बनसोडे (वय 21) आणि अभिजीत धनंजय बनसोडे (वय 18) यांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय नवनाथ बनसोडे यांचा फरसाण बनवण्याचा व्यवसाय असून त्यांची ग्लोबल फूड्स नावाची कंपनी आहे. मागील आठवड्यात (दि. 16 डिसेंबर) ते बेपत्ता असल्याची तक्रार महाळुंगे पोलिसात देण्यात आली होती. मात्र पोलिस तपासात  नागपुरातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंध आणि प्रेमप्रकरणातून मुलांनी जन्मदात्या बापाची हत्या करून फरसाणच्या भट्टीत जाळल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यापूर्वी दिल्लीत घडलेल्या तंदूर हत्याकांडामुळं देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे जिल्ह्यातही असाच प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड तालुक्यातील निघोजे या गावात राहणारे धनंजय बनसोडे यांची ग्लोबल फूड्स नावाची फरसाण बनवणारी कंपनी आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचे फेसबुकद्वारे नागपुरातील एका महिलेशी सूत जुळले होते. वडिलांचे दुसर्‍या महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती सुजीत आणि अभिजीत यांना समजली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बापलेकांमध्ये भांडणे होत होती. 15 डिसेंबरला याच कारणावरून वडिल आणि दोन्ही मुलांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही मुलांनी वडिलांच्या डोक्यात रॉडने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह फरसाणच्या भट्टीत टाकून जाळला. त्यानंतर आरोपी मुलांनी वडील धनंजय बनसोडे हे बेपत्ता असल्याची तक्रार खेड पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी धनंजय बनसोडे यांची शोधमोहीम सुरू केली. याशिवाय नागपुरातील प्रेयसी महिलेचीही पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी मुलांकडून जीवाला धोका असल्याचे धनंजय बनसोडे यांनी सांगितल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांची चौकशी केली असता त्यांनीच वडिलांची हत्या केल्याचा खुलासा झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता फरसाणच्या भट्टीत धनंजय बनसोडे यांची हाड जळालेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुजीत आणि अभिजीत या दोघांनाही अटक केली असून खेड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS