युवकांनी लोकशाही बळकट व समृद्ध करावी : तहसीलदार नानासाहेब आगळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकांनी लोकशाही बळकट व समृद्ध करावी : तहसीलदार नानासाहेब आगळे

कर्जत : प्रतिनिधी नववी ते बारावीचे विद्यार्थी हे येणाऱ्या काळातील नवमतदार आहेत. या विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी राबविली जाते याची माहिती

स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शिधापत्रिकाधारकांना मोफत साड्या वाटप
प्रेम व्यक्त करत महिलेशी गैरवर्तन करून चाकूने हल्ला
पाथर्डी व शेवगावांतील पिकांचे पंचनामे करावेत

कर्जत : प्रतिनिधी

नववी ते बारावीचे विद्यार्थी हे येणाऱ्या काळातील नवमतदार आहेत. या विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी राबविली जाते याची माहिती होणे गरजेचे आहे. युवकांनी लोकशाही बळकट व समृद्ध करावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जावे. अभ्यासामध्ये सातत्य ठेवले तर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास यश मिळते, असे प्रतिपादन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले.

कर्जत येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी समाज प्रबोधन संस्थेच्या निरीक्षक उषा राऊत यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावून सांगत त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्राचार्य चंद्रकांत राऊत यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आप्पासाहेब कांबळे यांनी केले. संपतराव बावडकर यांनी आभार मानले.

COMMENTS