Homeताज्या बातम्यादेश

मंदीच्या संकटातही भारत पाचवी मोठी अर्थव्यवस्था – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये आज अन्न, महागाई असे प्रश्‍न भेडसावत आहेत. अशा संकट काळातही भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. या गोष्टी

शांततेच्या संदेशासह जी-20 परिषदेची सांगता
जामखेड तालुक्यात मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत  
संजय राऊतांकडून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पाठराखण – प्रविण दरेकर

नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये आज अन्न, महागाई असे प्रश्‍न भेडसावत आहेत. अशा संकट काळातही भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान हवा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रदीर्घ चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, जागतिक संकटाच्या काळात भारत पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे  काही लोकांना दुःख वाटते. असे लोक भारतवासी नसून त्यांनी आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे मोदी यांनी सांगितले. जी-20 समुदायाचे अध्यक्षपद भारताला मिळणे गौरवास्पद आहे. देशात स्थिर व राष्ट्रहिताचे निर्णय घेणारे सरकार असून भारतात राजकीय गोंधळ नाही. आपल्या देशात सक्तीचे बदल नसून काळाची गरज म्हणून परिवर्तन होतेय.  करोना काळात ‘मेड इन इंडिया’ लस तयार झाली. भारताने जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. आपल्या देशाने 150 पेक्षा जास्त देशांना आपण औषधे पोहचवली, लस पोहचवली. भारतातले अनेक देश असे आहेत ज्यांना भारताविषयी कृतज्ञता वाटते. करोना काळात भारताने अभिमानास्पद कामगिरी केली. एक काळ असा होता जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी भारतात वाट बघावी लागायची आज टेक्नॉलॉजीच्याबाबतीत आपण स्वयंपूर्ण झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अनेकांना मी काय म्हणतो आहे ते समजण्यास थोडा वेळ लागेल असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला.आज भारताच्या समृद्धीमध्ये जग आपली समृद्धी पाहते आहे. निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक आपल्या देशाची प्रगती पाहूच शकत नाहीत सहन करू शकत नाहीत. भारताच्या 140 कोटी लोकांच्या शक्तीमुळेच देशाचा डंका जगभरात वाचतो आहे. गेल्या 9 वर्षात 90 हजार स्टार्ट अप्स सुरू झाले आहेत. स्टार्ट अप विश्‍वात आपण तिसर्‍या क्रमांकावर आहोत. आज भारत जगभरात मोबाइलच्या निर्मितीतला दुसरा देश असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

अदानी प्रकरणावर मौन – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत झालेल्या घमासान चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस राजवटीत देशाला भोगाव्या लागलेल्या त्रासाचा पुनरुच्चार केला. तसेच, मागील आठ वर्षात देश प्रत्येक क्षेत्रात समर्थ झाल्याचा दावा केला. अभिभाषणावरील चर्चेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यासह इतर प्रश्‍नांवर थेट बोलणे मात्र त्यांनी टाळले.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावरच हिंडनबर्ग रिसर्च संस्थेनं देशातील आघाडीचा उद्योगसमूह अदानी ग्रुपच्या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला. यातून अदानी समूहावर गैरव्यवहारांचे व फसवणुकीचे आरोप करण्यात आले. त्याचे पडसाद शेअर बाजारासह राजकीय वर्तुळातही उमटले.

COMMENTS