Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लष्कराच्या परीक्षेमध्ये डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट उघड

पुणे/प्रतिनिधी ः भारतीय लष्कराच्या बॉर्डर रोड आर्गनायझेशन (बीआरओ) लेखी परीक्षेत डमी विद्यार्थी बसवून पेपर दिले जात असल्याचे रॅकेट उघडकीस आले आहे.

सामाजिक बांधिलकीतून जनसेवेचे व्रत प्रेरणादायी
द केरला स्टोरी’ चित्रपटाने केले 200 कोटींचे कलेक्शन
पवार साहेब कितने पैसे है,गिन गिन के हिसाब लेंगे (Video)

पुणे/प्रतिनिधी ः भारतीय लष्कराच्या बॉर्डर रोड आर्गनायझेशन (बीआरओ) लेखी परीक्षेत डमी विद्यार्थी बसवून पेपर दिले जात असल्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रामपती विश्‍वंभर दयाल (23, रा. उत्तर प्रदेश), परमजित विजयपाल सिंग (32, रा. उत्तर प्रदेश) व सोन सुरेश (22, रा. हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अमन सुरेश (19, रा. हरियाणा) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बीआरओचे सहायक प्रशासन अधिकारी अरुणकुमार एस. व्ही. (46, रा. धानोरी, पुणे) यांनी आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या संरक्षण विभागामार्फत ग्रीफ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत पुण्यातील धानोरी परिसरात बीआरओ स्कूल अँड सेंटर येथे मंगळवारी लेखी परीक्षा घेण्यात येत होती. त्या वेळी परमजितसिंग याने त्याच्या जागेवर परीक्षेस रामपती दयाल यास बसवले होते, तर अमन सुरेश याने त्याच्या जागी सोनू सुरेश याला परीक्षेसाठी डमी विद्यार्थी म्हणून बसवले होते. परंतु परीक्षा हॉलतिकीट तपासणीदरम्यान ही बाब निरीक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांचे कारनामे उघडकीस आले. याप्रकरणी तोतायेगिरी करून फसवणूक केल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. चौधरी याबाबत पुढील तपास करत आहेत.

COMMENTS