Homeताज्या बातम्या

केरळमधील ट्रान्सजेंडर जोडप्याने दिली गरोदरपणाची गोड बातमी

सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली

केरळ प्रतिनिधी - केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. जिया आणि जहाद अशी त्यांची नावे असू

लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र राज्याच्या प्रगतीचे आधारस्तंभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे ः विवेक कोल्हे
मुक्रमाबाद येथे संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न;ह.भ.प. रंगनाथ महाराज कंधारकर यांच्या कीर्तनाने मुक्रमाबाद नगरी दुमदुमली

केरळ प्रतिनिधी – केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. जिया आणि जहाद अशी त्यांची नावे असून त्यांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. यासोबतच दोघांनीही त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स कमेंट करत आहेत हे दोघे केरळच्या कोझिकोडमध्ये ३ वर्षांपासून एकत्र राहत होते जियाचा जन्म पुरुष म्हणून झाला होता आणि आता ती स्त्री झाली. जहाद एक स्त्री म्हणून जन्माला आला आणि पुरुषात बदलला. जियाने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले- “मी जन्माने किंवा माझ्या शरीराने स्त्री नसली तरी, मला कोणी आई म्हणावे असे स्वप्न होते. आम्ही तीन वर्षांपासून एकत्र आहोत. जहादचे स्वप्न आहे की तो एक पिता म्हणून ओळखला जावे. त्याच्या सहाय्याने माझ्या पोटात 8 महिन्याचं बाळ आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक यूजर्सनी दोघांचे अभिनंदन केले आहे. जिया तिच्या गरोदरपणामुळे खूप खूश आहे. या  प्रकरणात हा गर्भधारणा करणारा भारतातील पहिला ट्रान्स पुरुष आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

COMMENTS