Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेच्या प्रत्येक डब्यात असणार टॉकबॅक अन् सीसीटीव्ही

मुंबई ः  मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणार्‍या महिलांचा प्रवास सुखर होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या महिलांची सुरक्षा जपणे सोपे होणार आह

शिक्षक बँक राज्य कार्यक्षेत्र निर्णय तहकूब ; वार्षिक सभेत काहीकाळ गोंधळ
काकाला नाही झाली सहन पुतण्याने केलेली चोरी…
जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची संजीवनीस भेट

मुंबई ः  मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणार्‍या महिलांचा प्रवास सुखर होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या महिलांची सुरक्षा जपणे सोपे होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून टॉकबॅक आणि सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक महिलांच्या डब्ब्यात बसवले जाणार आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ होईल. काही दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांच्या महासंचालक कार्यालयाने रेल्वेच्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले होते.

ामध्ये महिलांना प्रवासात जाणवणार्‍या समस्या विचाराण्यात आल्या. यातील अनेक महिलांनी असे म्हटले की, रात्री आणि पहाटे 6 पर्यंत प्रत्येक लेडीज डब्ब्यात एक सुरक्षारक्षक अथवा पोलीस तैनात असतात. या सुवेधेत आणखी भर टाकावा. पोलिसांसह प्रत्येक महिला डब्ब्यात एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि एक टॉकबॅक बसवण्यात यावा, अशी मागणी 59 टक्के महिलांनी केली होती. त्यानुसार मध्य आणि पश्‍चिम रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि टॉकबॅक बसवण्यात येणार आहे. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेतील लोकल ट्रेनमध्ये असलेल्या 771 डब्ब्यांपैकी 606 डब्ब्यांमध्ये सीसीटीव्ही कमेरे आधीच बसवण्यात आलेले आहेत. यातील उर्वरीत डब्ब्यांमध्ये मेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅक बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टॉकबॅकमध्ये महिलांना कोणतीही समस्या जानवल्यास थेट गार्डशी संपर्क साधता येणार आहे. गेल्या काही दिवसांत महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना मोठ्याप्रमाणावर वाढल्यात. महिलांच्या डब्ब्यामध्ये शिरुन त्यांच्यावर हल्ले झाल्याच्या दोन घटना काही महिन्यांपूर्वीच घडल्यात. यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलांच्या डब्ब्यात शिरून त्यांच्यावर अत्याचार आणि हल्ला करण्याच्या धक्कादायक घटनांनी मुंबई हादरली आहे. तेव्हापासून लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याचे प्लानींग सुरू आहे.

COMMENTS