Homeताज्या बातम्या

मुंबईत मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या जयपूरच्या २० वर्षीय विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या, ताडदेवमधील आदित्य हाईट्स येथील घटना

मुंबई - मुंबईच्या ताडदेव परिसरातील आदित्य हाईट्स इमारतीतून उडी मारून २० वर्षीय मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सम

प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध दोषारोप निश्‍चितजुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून न्यायालयीन सुनावणीला प्रारंभ
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या
mumbai girl suicide from 23rd floor of oberoi complex goregaon मुंबई : २३  व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या, ओबेरॉय संकुलातील चौथी आत्महत्या

मुंबई – मुंबईच्या ताडदेव परिसरातील आदित्य हाईट्स इमारतीतून उडी मारून २० वर्षीय मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कार्तिक असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा राजस्थानमधील जयपूरचा रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कार्तिक ताडदेव येथील आदित्य हाईट्स या इमारतीत राहून मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. काल रात्री इमारतीतील १२ व्या मजल्यावरील रेफ्युजी एरियातून उडी मारून त्याने जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्तिकने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप अस्पष्ट असून ताडदेव पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनेनंतर कार्तिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत कार्तिकचे वडील राजस्थानमध्ये मोठ्या सरकारी पदावर कार्यरत आहेत. मुलाच्या दुर्दैवी निधनाची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.

COMMENTS