Homeताज्या बातम्या

प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध दोषारोप निश्‍चितजुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून न्यायालयीन सुनावणीला प्रारंभ

पुणे : देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती परदेशी व्यक्तीपर्यंत पोहोचवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या संरक्षण संशोधन क्षेत्रातील माजी

आमदार-खासदार 50-50 कोटींना विकले जातायतराज ठाकरेंची जैन मुनींसह भाजपवर घणाघाती टीका
शिक्षणमंत्र्यांविरोधात चप्पल मारणारे अनोखे यंत्र; नागपुरातील सुशिक्षित तरुणांच्या या ‘अहिंसक’ आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द करा या मागणीसाठी किसान सभेची निदर्शने
DRDO Pradeep Kurulkar Case: प्रदीप कुरुलकरविरुद्ध आरोप निश्चित; जुलैमध्ये  सुनावणी


पुणे : देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती परदेशी व्यक्तीपर्यंत पोहोचवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या संरक्षण संशोधन क्षेत्रातील माजी वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध न्यायालयाने दोषारोप निश्‍चित केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्यक्ष सुनावणीचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून खटल्याची सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
डॉ. कुरुलकर यांच्यावर शासकीय गुपिते अधिनियम, 1923 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी संपर्क ठेवून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात संबंधित महिला बनावट ओळख वापरत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सामाजिक माध्यमांद्वारे झालेल्या संपर्कातून डॉ. कुरुलकर कथितपणे जाळ्यात अडकले. त्यानंतर संरक्षण क्षेत्राशी संबंधित काही संवेदनशील माहितीची देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दहशतवादविरोधी पथकाने 4 मे 2023 रोजी डॉ. कुरुलकर यांना अटक केली होती. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे, संवाद नोंदी आणि इतर कागदपत्रांची छाननी करण्यात आली. त्यानंतर जून 2023 मध्ये विशेष न्यायालयात सुमारे दोन हजार पानांचे विस्तृत आरोपपत्र सादर करण्यात आले होते. आरोपपत्रातील माहितीनुसार, डॉ. कुरुलकर आणि संबंधित महिलेमधील संवादातून संरक्षण क्षेत्रातील काही संवेदनशील माहितीची देवाणघेवाण झाल्याचे तपास यंत्रणांनी नमूद केले आहे. या प्रकरणातील पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयीन प्रक्रिया पुढे सरकणार आहे. न्यायालयाने दोषारोप निश्‍चित केल्यानंतर आता खटल्याच्या सुनावणीला वेग येणार असून सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष आपापले युक्तिवाद मांडतील. देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे या खटल्याकडे संरक्षण क्षेत्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS