नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला, बालकल्याण व शिक्षण समितीच्या सभापती स

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला, बालकल्याण व शिक्षण समितीच्या सभापती सदिच्छा सोनी-पाटील यांच्या बाबानगर येथील जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देत महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री प्रणिता देवरे- चिखलीकर यांची उपस्थिती होती.
या भेटीदरम्यान महिला व बालकल्याण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, शिक्षण, आरोग्य तसेच महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणार्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. महिलांसाठी प्रशिक्षण केंद्रांची उभारणी, स्वयंरोजगाराच्या संधी वाढविणे आणि तळागाळातील महिलांपर्यंत शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ पोहोचविण्याबाबत सकारात्मक चर्चा यावेळी झाली. यावेळी सदिच्छा सोनी-पाटील यांनी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांचे सविस्तर निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, स्वावलंबनाला चालना आणि स्थानिक स्तरावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय वाढविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणार्या विधायक उपक्रमांना सकारात्मक सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. त्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे महिला विकासाशी संबंधित उपक्रमांना अधिक गती आणि बळ मिळेल, असा विश्वास यावेळी सदिच्छा सोनी पाटील व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिलेल्या वेळेबद्दल, मार्गदर्शनाबद्दल आणि सकारात्मक प्रतिसादाबद्दल सदिच्छा सोनी-पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

COMMENTS