Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्हाबॅकेच्या संचालकपदी बि आर कदम यांची निवडमतदार महाबळेश्वरला नेऊन सुद्धा एक मत फुटले

नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांच्या  सुक्ष्म नियोजनामुळे तसेच आ.श्रीजया चव्हाण यांनी अथक प्रयत्न करून सुद

विवाहित महिलेस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल
जिल्हा बँक निवडणुकीत अशोक चव्हाणांची संभाव्य एंट्री; नांदेडच्या सत्तासमीकरणांना नवी कलाटणी
एज्युव्हिजन व न्यू इरा किड्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘यमी टम्मी’ आनंदनगरी उत्साहात



नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांच्या  सुक्ष्म नियोजनामुळे तसेच आ.श्रीजया चव्हाण यांनी अथक प्रयत्न करून सुद्धा मताची फटाफट झाली.अर्धापूर तालुक्यातून भाजपाचे बि.आर.कदम हे  मोठ्या फरकाने निवडून येऊन सुद्धा फुटलेल्या मताची चर्चा जोमात सुरू आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 23 जागापैकी 11 जागा बिनविरोध आल्या होत्या. तसेच 12 जागेसाठी 26 निवडणुकीच्या रिंगणात होते.अर्धापूर तालुक्यातून बि.आर.कदम व ज्ञानेश्वर राजेगोरे यांच्यात अटीतटीची निवडणूक होईल असे चित्र रंगविले होते. सोसायटी मतदार संघात 35 मतदारांपैकी 35 जणांनी मतदान करून शंभर टक्के मतदान झाले,तर संस्था मतदार संघातून 6 पैकी 6 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी भाजपाचे बि आर कदम यांना 30 मतदान मिळाले तर ज्ञानेश्वर राजेगोरे यांना 4 मते मिळाली. 1 मतदान बाद झाले. अनेक मतदारांना महाबळेश्वर सहल घडून आणली  तरी सुद्धा बि. आर.कदम यांचे 1  मतदान फुटल्याने जेलमध्ये सुरूगं झाल्याने फुटलेले मतदान कोणाचे याची चर्चा राजकीय मंडळीत जोमाने होत आहे.  नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक बी आर.कदम यांचा सत्कार करताना गोविंदराव नागेलीकर,भाजप जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख,माजी सभापती किशोर स्वामी,सभापती संजय देशमुख लहानकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,कृऊबा संचालक तथा जिल्हाध्यक्ष निळकंठराव मदने, प्रदेश प्रतिनिधी डॅा.लक्ष्मण इंगोले, नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे,बाळू पाटील धुमाळ, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष गुरुराज रणखांब, बालाजी कदम,परमेश्वर बंडाळे,उमेश सरोदे,दत्ता नवले,भाजयुमोचे अजय देशमुख,सुरज माडे, तालुका उपाध्यक्ष कोंडीबा सूर्यवंशी,दिलीप डाहाळे  यांच्यासह अनेकांनी सत्कार केला.

COMMENTS