Homeताज्या बातम्याबीड

वाहतूक नियमभंग करणार्या रिक्षाचालकांना जिल्हा वाहतूक शाखेचा दणका; 31 रिक्षा जप्तजिल्हा न्यायालयात देखील 35 बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई

बीड : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणार्या रिक्षाचालकांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने धडक कारवा

गेवराईत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा धडक छापा; तीन पीडित महिलांची सुटका, दोन महिलांविरुद्ध गुन्हागुप्त माहितीच्या आधारे एएचटीयू ची कारवाई; डमी ग्राहकाच्या मदतीने उघड झाला प्रकार
पेठ बीड डीबी पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा.2.07 लाखांचा मुद्देमाल जप्त,सहा जुगारी ताब्यात
जुन्या वादातून तरुणाचा खूनस्थानिक गुन्हे शाखेकडून 12 तासांत आरोपी जेरबंद


बीड : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणार्या रिक्षाचालकांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 31 रिक्षांवर कारवाई करत त्या जप्त करण्यात आल्या. तसेच जिल्हा न्यायालयामध्ये देखील 35 अस्ताव्यस्त वाहन उभे केलेल्या वाहनधारकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.या कारवाईमुळे नियमभंग करणार्या वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ही मोहीम पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णु जायभाये, पोलीस हवालदार मनोज जायभाये, ज्ञानेश्वर जाधव, फुलचंद जाधव, त्रिंबक कुडके, राजाभाऊ तांदळे, पोलीस हवालदार गणेश तळेकर, आदिनाथ मुंडे, सखाराम घोलप, पोलीस अंमलदार संतोष मोरे, राहुल घाडगे, पोलीस चालक संतोष हारके, दत्ता कदम पथकाने शहरातील विविध चौक, मुख्य रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणार्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई केली.
कारवाईदरम्यान वाहनांचे परवाने, नोंदणी कागदपत्रे, विमा, फिटनेस प्रमाणपत्र, प्रदुषण प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच वाहतूक नियमांचे पालन यांची सखोल पडताळणी करण्यात आली. आवश्यक कागदपत्रांचा अभाव, नियमांचे उल्लंघन आणि बेशिस्त वाहनचालकांना कोणतीही सवलत न देता संबंधित रिक्षा जप्त करण्यात आल्या. शहरातील वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने आणि अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
चौकट
बेशिस्त चालकांनी ड्रेसकोड, बॅचबिल्ला, सर्व कागदपत्रे इन्शुरन्स आणि सगळ्याचे महत्वाचे गाडी स्वच्छ ठेवणे आणि माता-भगिनींशी आदराने वागणे तसेच वाहतुकीत बेशिस्तीला कोणताही थारा दिला जाणार नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या प्रत्येक वाहनचालकावर नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. वाहनधारकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
– वैभव पाटील
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, बीड

COMMENTS