भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू तथा भारतीय जनता पक्षाचे नेते केदार जाधव यांनी सोमवारी परळी वैजनाथ येथे भेट देत देशातील पंचम ज्योतिर्लि

भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू तथा भारतीय जनता पक्षाचे नेते केदार जाधव यांनी सोमवारी परळी वैजनाथ येथे भेट देत देशातील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रभू श्री वैद्यनाथांचा विधिवत अभिषेक करून पूजा-अर्चा केली.
वैद्यनाथ मंदिरात आगमनानंतर वैद्यनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख व विश्वस्त प्रा. बाबासाहेब देशमुख यांनी केदार जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पुणे येथील उद्योजक सुदर्शन वाघ हे श्री केदार यांच्या समवेत उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मंदिरातील धार्मिक विधी पार पाडत प्रभूंचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यानंतर केदार जाधव यांनी गोपीनाथगड येथे जाऊन भारतीय जनता पक्षाचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत त्यांना अभिवादन केले. या भेटीदरम्यान त्यांनी मुंडे साहेबांच्या कार्याचे स्मरण करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर केदार जाधव यांनी परचुंडी येथील प्रेस फोटोग्राफर श्री. भीमाशंकरआप्पा नावंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांनी नावंदे कुटुंबीयांसोबत भोजनाचा आस्वाद घेत मनमोकळा संवाद साधला. या प्रसंगी युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे, प्रेस फोटोग्राफर श्री. भीमाशंकरआप्पा नावंदे, कृष्णा मुंडे डाबीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. केदार जाधव यांच्या परळी दौर्यामुळे शहरासह परिसर व पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या भेटीसाठी असंख्य क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. अनेकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या, तर सेल्फी आणि छायाचित्रे काढण्यासाठीही मोठी गर्दी केली. केदार जाधव यांनीही चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. त्यांच्या साधेपणाने आणि आपुलकीच्या स्वभावाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या भेटीमुळे परळीतील युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.

COMMENTS