Homeताज्या बातम्या

NEET पेपरफुटी आंदोलन हिंसाचार प्रकरण: तेज प्रताप यादव यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पटना: नीट (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बिहार बंद आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी जनशक्ती जनता दल पक्षाचे अध्यक्ष तेज प्रताप

आमदार रोहित पवारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रकृती खालावली, शासनाला दिला ‘अल्टिमेटम’
सोन्या-चांदींच्या दरात मोठी घसरण
नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
तेजप्रताप यादव यांना अटक - पुरोगामी विचाराचे एकमत

पटना: नीट (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बिहार बंद आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी जनशक्ती जनता दल पक्षाचे अध्यक्ष तेज प्रताप यादव यांना पटना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविवारी पहाटे पटना न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला.

तेज प्रताप यादव हे आंदोलनाच्या समर्थनासाठी गांधी मैदानाजवळ असलेल्या राम गुलाम चौकात सहभागी झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत (ज्युडिशियल कस्टडी) रवानगी केली आहे.

COMMENTS