Homeताज्या बातम्या

स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठी दुर्घटना! समुद्री माईनला धडकून जहाजात प्रचंड स्फोट; जागतिक चिंतेत भर

तेहरान: अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढला असतानाच स्ट्रेट ऑफ होर्मुज (Strait of Hormuz) मधून एक अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. या जलम

जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ नरसी-नायगावात तीव्र आंदोलन; महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय नाट्य! अविश्वास प्रस्तावाला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळताच १४ संचालकांचे सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र?
नायगाव तालुक्यातील काही ग्रामसेवक ‘बिनपत्त्याचे’; मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने नागरिकांचे हाल
Oil tanker explodes in Strait of Hormuz after hitting naval mine: Iranian  media

तेहरान: अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढला असतानाच स्ट्रेट ऑफ होर्मुज (Strait of Hormuz) मधून एक अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. या जलमार्गावरून जाणारे एक मोठे जहाज समुद्री माईनला (Sea Mine) धडकल्याने या ठिकाणी प्रचंड भीषण स्फोट झाला आहे. इराणच्या न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज मार्ग भरकटल्यामुळे समुद्री माईनला धडकले आणि त्यानंतर हा अपघात घडला.

दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेले भीषण युद्ध तब्बल ४० दिवस चालले होते. या युद्धात अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. तर दुसरीकडे इराणनेही इस्रायलवर ड्रोन आणि रॉकेट हल्ले चढवत मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले होते. या युद्धाच्या काळात इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज हा महत्त्वाचा सागरी मार्ग रोखण्यासाठी पाण्यात ठिकठिकाणी समुद्री माईन्स पेरून ठेवले होते. तसेच या मार्गाने ये-जा करणाऱ्या कोणत्याही व्यापारी जहाजावर हल्ल्याचा इशारा दिला होता.

हा सागरी मार्ग बंद झाल्यामुळे भारतासह संपूर्ण जगासमोर मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले होते. कारण भारताच्या एकूण गरजेपैकी जवळपास ४० टक्के कच्च्या तेलाची आणि एलपीजी गॅसची वाहतूक याच मार्गाने होते. ४० दिवसांनंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला होता आणि परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.

यातच आता ही भीषण दुर्घटना घडल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. माईनला धडकलेले जहाज नेमके कोणत्या देशाचे होते आणि त्यावर एकूण किती क्रू मेंबर्स (कर्मचारी) उपस्थित होते, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे सागरी व्यापार आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर पुन्हा एकदा सावट निर्माण झाले आहे.

COMMENTS