Homeमहाराष्ट्र

जमिनीच्या वर्ग-१ नोंदीसाठी उपोषणाचा इशारा; शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाची घोषणा

शहरटाकळी: शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील गट क्रमांक ४७ मधील सर्व पोटहिस्स्यांच्या ७/१२ उताऱ्यावर धारणाप्रकार 'वर्ग-१' ची नोंद करण्याच्या मागणीस

सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनास केजकरांचा पाठिंबा; विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध!
आष्टी पोलिसांची धडक कारवाई; २४३ गुन्ह्यांतील ७.८४ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट!
स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांची दमदार कामगिरी! जबरी चोरी, घरफोडी, सोलार प्लांटवर चोरी करणारी टोळी केली जेरबंद
शेवगाव तहसील कार्यालय परिसरातून जेसीबी चोरी; शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार  दाखल | Navarashtra

शहरटाकळी: शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील गट क्रमांक ४७ मधील सर्व पोटहिस्स्यांच्या ७/१२ उताऱ्यावर धारणाप्रकार ‘वर्ग-१’ ची नोंद करण्याच्या मागणीसंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत ज्ञानदेव बाजीराव फासाटे आणि अशोक बापुसाहेब बोरुडे यांनी ३० जुलैपासून शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशरा निवेदनाद्वारे दिला आहे.

मजलेशहर येथील गट क्रमांक ४७ हा मूळ सर्व्हे क्रमांक २४ मधून तयार झाला आहे. या गटातील बहुतांश पोटहिस्से धारणाप्रकार ‘वर्ग-१’ मध्ये असताना काही पोटहिस्से अद्याप ‘वर्ग-२’ मध्येच असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मूळ सर्व्हे क्रमांक एकच असल्याने सर्व पोटहिस्से वर्ग-१ मध्ये नोंदवावेत, अशी रास्त मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात महसूल प्रशासनाकडे अनेकदा अर्ज व निवेदने सादर करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने येत्या सात दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास ३० जुलैपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे उपोषणाचा इशारा दिलेले फासाटे आणि बोरुडे हे दोघेही ज्येष्ठ नागरिक असून त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

COMMENTS