नागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी सकाळी सकाळी एक मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील गजबजलेल्या पंचशील चौकात मनपाच्या भरधाव बसने शालेय विद्यार्थ्यांना घेऊ
नागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी सकाळी सकाळी एक मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील गजबजलेल्या पंचशील चौकात मनपाच्या भरधाव बसने शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात व्हॅनमधील 3 ते 4 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे. संबंधित स्कूल व्हॅन ही पत्रकार भवनाकडून कॅनल रोडच्या दिशेने जात होती. याच दरम्यान पंचशील चौकात समोरून येणार्या भरधाव बसने व्हॅनला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की स्कूल व्हॅनचे मोठे नुकसान झाले.

COMMENTS