Homeताज्या बातम्या

पुरुषोत्तमपुरी गोदापात्रात बुडणार्‍या भाविकास वाचवले; जवानांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार

तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रोत्सवादरम्यान गोदावरी नदीपात्रात स्नानासाठी उतरलेल्या एका भाविकाचा पाण्याच्या खोल भागात जाऊन बुडण्या

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला वेग; 7 ते 10 जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरेप्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देत लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश-गोदावरी नदीपात्रात पाणी सुटणार
मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न



तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रोत्सवादरम्यान गोदावरी नदीपात्रात स्नानासाठी उतरलेल्या एका भाविकाचा पाण्याच्या खोल भागात जाऊन बुडण्याचा प्रसंग ओढवला. मात्र, तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या होमगार्ड जवानांनी प्रसंगावधान राखत तत्काळ मदत केल्याने भाविकाचे प्राण वाचले.
होमगार्ड जवान राजू हरिभाऊ पंडित, मुजाहेद उस्मान शेख आणि सुरेश वैजनाथ भारस्कर यांनी धाडस व तत्परता दाखवत संबंधित भाविकास सुखरूप नदीबाहेर काढले. त्यांच्या या शौर्यपूर्ण कार्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. जवानांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती जयदत्त अण्णा नरवडे, उपसभापती श्रीहरी नाना मोरे, माजी उपसभापती निळकंठराव भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी जवानांच्या धाडसाचे व सेवाभावाचे कौतुक करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच अधिकमास यात्रोत्सवादरम्यान भाविकांनी नदीपात्रात स्नान करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले. सत्कार कार्यक्रमास बाजार समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS