शासकीय योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये : तहसीलदार विजय बोरुडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये : तहसीलदार विजय बोरुडे

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : शासन आणि प्रशासन समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे. परंतु योग्य कागदपत्रे पूर्तते अभावी अथवा इतरही कारणाम

मुख्याधिकारी सरोदे यांची अखेर बदली
वाईनविरोधात अण्णांनी पुकारला अखेर एल्गार ; 14 फेब्रुवारीपासून उपोषण इशारा
धारुर घाटात डॉ. आंबेडकर विकास मंचचा रास्ता रोको l LokNews24

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : शासन आणि प्रशासन समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे. परंतु योग्य कागदपत्रे पूर्तते अभावी अथवा इतरही कारणामुळे त्यात विलंब होत असल्यास सेतू चालकांनी त्यात मदतनिसाची भूमिका घेऊन सर्व शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत करण्याचे आवाहन कोपरगावचे तहसीलदर विजय बोरुडे यांनी सेतू चालकांना केले.
    कोपरगाव तहसील कार्यालयात तालुक्यातील सेतू चालकांची आयोजित बैठकीत ते बोलत होते
सेतू चालकांना मार्गदर्शन करताना तहसीलदार बोरुडे  म्हणाले की सेतू चालक हे प्रशासन आणि जनतेमधील दुवा आहे. सेतू चालकांना कामामध्ये आणि अर्जदारांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी कोपरगाव तहसील आपल्या कायम पाठीशी उभे राहील, तसेच आपणही अर्जदारास चांगली सेवा देऊन त्यांचे समाधान करावे .यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व अडी अडचणी सोडवण्याच्या कडक सूचनाही संबंधितांना त्यांनी केल्या, समाजातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी प्रत्येक खेडोपाडी कॅम्पचे नियोजन केले असल्याची माहिती बोरुडे यांनी दिली , त्याचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान ही त्यांनी केलेया बैठकीला नायब तहसीलदार श्रीमती नलिनी  कुलकर्णी ,चंद्रशेखर कुलथे , श्री.  चौरे  यांनी मार्गदर्शन केले. कोपरगाव सेतू चे संचालक सागर शिंदे यांनी यांनी सेतू चालकांच्या वतीने सेतू कार्यालय चालविताना येणाऱ्या अडचणी संदर्भात सूचना मांडल्या, यावेळी पराग खंडीझोड, रवी टेके, दीपक पानगव्हाणे, सतीश कदम व कोपरगाव तालुक्यातील इतर सेतू चालकांनी उपस्थित होते Attachments area

COMMENTS