गेवराई पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक पिकअप

गेवराई पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक पिकअप आणि दोन ट्रॅक्टरसह एकूण 17 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गेवराई पोलीस गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार खालील कारवाई करण्यात आली: कोल्हेर रोडवरील कारवाई: दिनांक 1 जुलै रोजी पहाटे 5:00 वाजेच्या सुमारास कोल्हेर रोडवरून अवैध वाळू वाहतूक करणारा एक अशोक लेलँड कंपनीचा ’बडा दोस्त’ पिकअप (क्र. चक23-ण7280) पकडण्यात आला. या कारवाईत 8 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोह/182 बिंबिसार डोळस करत आहेत. हिंगणगाव परिसरात कारवाई: त्याच दिवशी सकाळी 11:00 वाजेच्या सुमारास हिंगणगाव येथील गोदावरी नदीपात्रात छापा टाकून अवैध वाळू उपसा करणारे दोन स्वराज ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले. हे दोन्ही ट्रॅक्टर विना क्रमांकाचे असून, यात एकूण 9 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे गेवराई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोह/954 हंबर्डे करत आहेत. ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह अतुलकुमार लांडगे, समाधान दौड आणि गेवराई पोलीस ठाण्यातील इतर कर्मचार्यांच्या पथकाने सहभाग घेतला होता.

COMMENTS