Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजूपहिल्याच दिवशी खातेप्रमुखांच्या कामकाजाचा घेतला आढावा; विकासकामांना गती देण्याच्या सूचना

नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी

पोलिओ लसीकरणास बेलापूरमध्ये मोठा प्रतिसाद 
लोकमंथन इफेक्ट : राहाता ग्रामीण रुग्णालयात पाण्याची व्यवस्था सुरु 
सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात 3,179 बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण यशस्वी..शंभर टक्के लसीकरणासाठी प्रभावी नियोजन; डीटीओ डॉ.माने यांच्याकडून कौतुक..



नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी त्यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
महेश पाटील हे यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. शासनाने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर महेश पाटील यांनी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शासनाच्या लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित विकासकामांना गती, तसेच नागरिकांना दर्जेदार व वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकार्‍यांना दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपआयुक्त डॉ. डी. बी. खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंते खराडे, संजय शिंदे, बालाजी पवार, व्यंकटराव चव्हाण, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

COMMENTS