Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिस इंडिया रायझिंग स्टार 2023 अ‍ॅट ताज किताबने सातारची कु. स्नेहल चांगण सन्मानीत

कु. स्नेहल चांगण सातारा तालुक्यातील कण्हेर या गावची मुळची रहिवाशी असून शिक्षणाच्या निमित्ताने सातारा शहरात राहत होती. तसेच नोकरीनिमित्त गुजरात राज्य

फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचा राजीनामा
पाठीत खंजीर खुपसण्याचे शिवाजीराव नाईक यांचे काम : राहुल महाडीक
राजमाची येथील विहिरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवनदान

कु. स्नेहल चांगण सातारा तालुक्यातील कण्हेर या गावची मुळची रहिवाशी असून शिक्षणाच्या निमित्ताने सातारा शहरात राहत होती. तसेच नोकरीनिमित्त गुजरात राज्यात आता स्थालांतरीत होणार आहे. सध्या वर्क फ्रॉम होम पध्दतीने कामकाज सुरु असल्याने या स्पर्धेसाठी चांगली तयारी करताना अडचणी आल्या नसल्याचेही कु. स्नेहल हिने बोलताना सांगितले.

सातारा / प्रतिनिधी : ताज इव्हेंटन्स् अ‍ॅण्ड प्रॉडक्शन या संस्थेने आयोजित केलेल्या मिस इंडिया 2023 ब्युटी पेजंट अ‍ॅट ताज या स्पर्धेतील मिस इंडिया रायझिंग स्टार 2023 अ‍ॅट ताज हा किताबावर सातारची कु. स्नेहल नंदकुमार चांगण हिने आपले नाव कोरले.
पुणे शहरातील बालेवाडी येथील सदानंद रिजन्सीमध्ये मिस इंडिया 2023 ब्युटी पेजंट ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये देशभरातून स्पर्धक आले होते. यामध्ये स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यात कु. स्नेहल नंदकुमार चांगण हिला यश आले. अल्पावधीत मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. कु. स्नेहल चांगण ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये अभियंता आहे. सध्या ती मेडिकल कोडींग अ‍ॅनालिस्ट या पदावर एजीएस हेल्थ केअर, गुजरात स्थित कंपनीमध्ये कार्यरत आहे. खासगी संस्थेतील नोकरी संभाळत तिने आपला हा छंद जोपासला आहे. कु. स्नेहल हिस मिस इंडिया ब्युटी पेजंट पुरस्काराची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर पिया रॉय यांच्या हस्ते मिस इंडिया रायझिंग स्टार 2023 अ‍ॅट ताज या पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले. तिला या स्पर्धेसाठी कुटुंबातील वडील, भाऊ यांनी पाठबळ दिले.

COMMENTS