Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येरवळे येथील सुरज यादव जवान आसाममध्ये शहिद

कराड / प्रतिनिधी : येरवळे (ता. कराड) येथील सुरज मधुकर यादव या जवानाचा धीमापूर (आसाम) याठिकाणी सैन्यदलात सेवा बजावत असताना हृदय विकाराच्या धक्क्या

गुरुकुल स्कूल ठरली संपूर्ण लसीकरण करणारी सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा
विधानसभे पाठोपाठ जिल्हा बँकेतही आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव; कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या सातारा कार्यालयावर दगडफेक
स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिनेता नाना पाटेकर यांच्याकडून अभिवादन

कराड / प्रतिनिधी : येरवळे (ता. कराड) येथील सुरज मधुकर यादव या जवानाचा धीमापूर (आसाम) याठिकाणी सैन्यदलात सेवा बजावत असताना हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. जवान सुरज यादव हा अवघ्या 32 वर्षाचे होते. सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेची माहिती रात्री उशिरा गावाकडे समजल्याने गावातील वातावरण सुन्न झाले आहे. ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे पार्थिव विमानाने उद्या बुधवारी पुण्यात येणार असून त्यानंतर गावाकडे येणार असल्याचे अधिकृत सुत्राकडून समजले.
याबाबत ग्रामस्थ व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, सुरज यादव 2007-08 दरम्यान भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. काही वर्षे पुण्यात तदनंतर बरेली (उत्तर प्रदेश) येथे सेवा त्यांनी बजावली होती. दक्षिण अफ्रिकेला शांतीदूत म्हणून ते गले होते. पुढे नागालँड (आसाम) याठिकाणी 111 इंजनिअर रेंजमेंन्ट विभागात ते कार्यरत होते. सध्या धीमापूर याठिकाणी सेवा बजावत असताना ह्रदय विकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. तेथून काही अंतरावर चायना बाँड्री आहे. सदरील घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. दूरध्वनीवरून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास येरवळे गावी घरी माहिती मिळली. या दुखःद घटनेमुळे कुटूंबीयांना अश्रू अनावर झाले. गावातील वातावरण सुन्न झाले आहे. आज दिवसभर नातेवाईक घरी येऊन माहिती घेत होते. वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत. सुरज त्यांचा एकुलता एक मुलगा होता. अतिशय शांत संयमी अणि मनमिळाऊ स्वभावाचे ते होते. गणेश जयंतीला तीन महिन्यापूर्वी ते गावी आले होते. दोन वर्षानी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मृत्युने गाव व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिमुकल्या ’कृष्णावंश’ चे बाबा हरवले
सुरज यादव यांचा 2016 साली त्यांचा विवाह झाला आहे. लग्नानंतर त्यांना 7 ते 8 वर्षांनी मुलगा झाला होता. त्या मुलाचा पुढील महिन्यात पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी सुरज गावी येणार होते. तत्पुर्वीच, हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुखःद घटनेने 11 महिन्याच्या चिमुकल्या ’कृष्णावंश’ चे बाबा हरवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS