Homeताज्या बातम्या

कायम कर्मचार्‍यांना 9 टक्के महागाई भत्ता मंजूर; गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या प्रशासकांचे कर्मचार्‍यांकडून आभार

गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या कायम कर्मचार्‍यांना दि. 1 जुलै 2026 पासून 9 टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बोर्डाच्या कर्मच

ट्युशन परिसरात टवाळखोरांचा उच्छाद; विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अस्थिव्यंग शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात कर्मचार्‍यांचे निवेदन
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले



गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या कायम कर्मचार्‍यांना दि. 1 जुलै 2026 पासून 9 टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बोर्डाच्या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह (आयएएस, निवृत्त) यांचे कर्मचार्‍यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह यांनी सध्याची वाढती महागाई तसेच बोर्डाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी घेतलेले परिश्रम लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरात गुरुद्वारा बोर्डामार्फत वार्षिक जोड मेला, वीर बाल दिवस, सामूहिक विवाह मेळावे तसेच साहिब श्री गुरु तेग बहादूर साहिब जी महाराज यांच्या 350 व्या शहीदी गुरुपर्वानिमित्त विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत प्रशासकांनी महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी दिली. महागाई भत्त्यातील 9 टक्के वाढीच्या निर्णयामुळे कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावले असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. याबद्दल गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या कर्मचार्‍यांनी प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह यांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS