राहाता : भारतीय स्टेट बँकेच्या राहाता शाखेच्या वतीने शारदा शैक्षणिक संकुलात बुधवारी (दि. १ जुलै) वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी शाळा परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.कार्यक्रमास शाखा व्यवस्थापक चंदन गवई, बँकेचे कर्मचारी रुपेश कुमार, पूनम भुजबळ तसेच शारदा शैक्षणिक संकुलाचे समिती सदस्य रमेश शिंदे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी चंदन गवई यांनी विद्यार्थिनींना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. बँकेच्या वतीने विद्यार्थिनींना पेन व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थिनींचा वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमास शारदा शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्या संसारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बोरसे, शारदा कन्या विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक राजकुमार साळवे, प्राध्यापक दिघे, आहेर, गमे, हरित सेनेचे व पर्यावरण मंडळाचे प्रमुख शंकर राठोड तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS