Homeताज्या बातम्या

छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची हत्या

कोरिया : छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खननाच्या जुन्या वादातून भाजप नेते भरतसिंह गहरवार उर्फ लल्लासिंह यांची निघृण हत्या करण्यात आल्याची

भाजपची ‘मोदी का परिवार’ मोहीम
आषाढी वारीतील ‘चरणसेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद400 हून अधिक वारकर्‍यांना आरोग्यसेवा व उपचारांचा लाभ
शहरातील 3 खेळाडूंची कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल कॅम्पसाठी निवड
भाजपा नेताओं में रेत को लेकर विवाद, गाड़ी में आग लगाकर भाजपा नेता की हत्या  Glibs - Glibs

कोरिया : छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खननाच्या जुन्या वादातून भाजप नेते भरतसिंह गहरवार उर्फ लल्लासिंह यांची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनहट परिसरातील कटगोडी गावात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.

वादाचे हिंसक रूपांतर झाल्यानंतर काही जणांनी गहरवार यांच्यावर हल्ला करून त्यांच्या वाहनावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

COMMENTS