Homeताज्या बातम्या

खा. वाकचौरे यांचा कोपरगावात निषेध

 कोपरगाव शहर : खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याच्या निषेधार्थ को

अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायद्यासाठी जनजागृती मोहीम; राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद22 जूनच्या अधिवेशनादरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन
राहुरी फॅक्टरीत तरुणाची आत्महत्या
महानगरपालिकेत पेन्शन असोसिएशनचे धरणेदोन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन


 
कोपरगाव शहर : खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरप्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
 यावेळी गगन हाडा म्हणाले, २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली होती. मतदारसंघात त्यांची फारशी ओळख नसतानाही शिवसैनिकांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. मात्र, २०१४ मध्ये त्यांनी पक्षाची साथ सोडली. त्यानंतरही पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी दिली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून त्यांना विजयी केले.
 हाडा यांनी आरोप केला की, निवडून आल्यानंतर वाकचौरे यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पुन्हा पक्षांतर करून शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला. हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडी आणि शिवसैनिकांच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात असल्याचा आरोप त्यांनी केला.
 या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात अत्यंत रोष पहावयास मिळत होता. त्यांच्या विरोधात घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून उठला होता. संतप्त शिवसैनिकांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मतदार संघात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला.

COMMENTS