Homeताज्या बातम्या

सेवानिवृत्ती म्हणजे सेवाभावाचा आदर्श : सैंदोरे

श्रीरामपूर :”सत्यम, शिवम्, सुंदरम् ही भारतीय संस्कृतीची जीवनमूल्ये असून ही संस्कृती माणसाला समर्पणाची शिकवण देते. अशा सेवाभावी संस्कृतीचे जतन करणारे कचरू जोर्वेकर यांची सेवानिवृत्ती ही समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आहे,” असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सैंदोरे यांनी केले.श्रीरामपूर येथील बेलापूर रस्त्यावरील काळे लॉन्स येथे कचरू जोर्वेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये होते. सुरेगाव येथील कुंभार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब भागवत व उषाताई भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. पल्लवी सैंदोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी चंद्रकला सैंदोरे, मंडणबाई वंजारे, मंदाकिनी उपाध्ये, माधुरी जोर्वेकर, नितीन जोर्वेकर, ताराताई सैंदोरे, जयश्री जोर्वेकर, मानसी सैंदोरे, आराध्या सैंदोरे, धनश्री सैंदोरे, शुभम जोर्वेकर, कृष्णा सैंदोरे, प्रथमेश जोर्वेकर, कार्तिक जोर्वेकर आदी उपस्थित होते.श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठान आणि मान्यवरांच्या हस्ते कचरू जोर्वेकर, जयश्री जोर्वेकर व शुभम जोर्वेकर यांचा शाल, श्रीफळ, ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, “पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या श्रमाधिष्ठित शिक्षण पद्धतीमुळे ग्रामीण व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. कचरू जोर्वेकर यांनी श्रमसाधना आणि ज्ञानसाधनेचा समन्वय साधत स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविले.अण्णासाहेब भागवत यांनीही आपल्या मनोगतात कचरू जोर्वेकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या पुढील आयुष्यास शुभेच्छा दिल्या. मंदाकिनी उपाध्ये, उषाताई भागवत, माधुरी जोर्वेकर आणि कचरू जोर्वेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मानसी सैंदोरे यांनी केले, तर नितीन जोर्वेकर यांनी आभार मानले.

आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी 14 कोटी 14 लाख निधीची मागणीआ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन
परिक्रमा पॉलिटेक्निकतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
ढेकणमोहा येथील गोरक्षनाथ विद्यालयाच्या प्राचार्यपदी संजय बडे सर यांची निवड

COMMENTS