कोपरगाव : “जगात कितीही मोठे यश मिळाले तरी माणसाने आपल्या मूळाशी नाते जपले पाहिजे. झाड कितीही उंच वाढले तरी त्याचे अस्तित्व जमिनीतील मुळांवरच अवलं

कोपरगाव : “जगात कितीही मोठे यश मिळाले तरी माणसाने आपल्या मूळाशी नाते जपले पाहिजे. झाड कितीही उंच वाढले तरी त्याचे अस्तित्व जमिनीतील मुळांवरच अवलंबून असते. त्याचप्रमाणे एस.एस.जी.एम. महाविद्यालय ही माझ्या आयुष्याची सुपीक भूमी असून येथील संस्कार माझी खरी ताकद आहेत. विज्ञान आपल्याला ज्ञान देते, परंतु मूल्ये त्या ज्ञानाला योग्य दिशा देतात. त्यामुळे शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे, तर समाजाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे.”, असे प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीचे माजी सदस्य डॉ. गोवर्धन हुसळे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे आरोग्य समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय डॉक्टर दिन कार्यक्रमात बोलत होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍड. संदीप वर्पे यांनी भूषविले.यावेळी अंकित कृष्णानी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येकाच्या आरोग्याची जबाबदारी केवळ डॉक्टरांची नसून प्रत्येक व्यक्तीची स्वतःचीही आहे. निरोगी जीवनासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि आरोग्याविषयी जागरूकता आवश्यक असल्याचे म्हटले.अध्यक्षीय मनोगतात ऍड. संदीप वर्पे यांनी, राष्ट्रीय डॉक्टर दिन डॉक्टरांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असून, रुग्णांच्या उपचारांमध्ये त्यांच्या ज्ञानासोबतच सेवाभाव, संवेदनशीलता आणि समर्पण यांचाही मोठा वाटा असतो. त्यामुळेच “डॉक्टरांच्या हातालाही गुण असतात” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

COMMENTS