Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्यात गुड मॉर्निग पथकाचे तीन तेरा !

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच लक्ष देण्याची गरज

देऊळगावराजा/प्रतिनिधी:- देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक गाव खेड्यात मुख्य रस्त्यावर व गावाच्या प्रवेशद्वारावर घाणीच्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक

राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशमुख यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी मंदिरास सदिच्छा भेट
नृत्यकला अकॅडमीची विद्यार्थिनी पौर्णिमा अंबरगे ठरली मिस फलटण
एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सत्कार

देऊळगावराजा/प्रतिनिधी:– देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक गाव खेड्यात मुख्य रस्त्यावर व गावाच्या प्रवेशद्वारावर घाणीच्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक लाभार्थी शौचालय अनुदान लाटून त्याचा वापर करीत नसल्याने पंचायत समिती ने पुढाकार घेऊन गुड मार्निग पथक कार्यान्वित केले परंतु नियोजनाचा अभाव दिसून येत असून आठ दिवसात तीन तर काही अधिकारी यांच्या कडून नऊ दहा गावात गेले अशी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली परंतु तालुक्यात पथकाने किती गावात किती टमरेल बहाद्दर यांना पकडले हा आकडा कुणाकडे नसल्याने तालुक्यात पथकाचे तीन तेरा वाजले म्हटल्यास वावगे ठरू तसेच एका गाडीच्या भरवश्यावर ६४गावात सहा पथक केव्हा पोहचतील हा प्रश्न असतांना गाडीचा इन्शुरन्स संपल्याने पथक थंडावले असल्याचे आधिकारी सांगत असून काही ठिकाणी खाजगी वाहनाने सुद्दा गेल्याचे सांगत असून एकूण किती गावात पथक गेले हे ठोस उत्तर कुणाकडेही नाही हे
शासनाने मोठा गाजा वाजा करून गावोगाव हागणदारीमुक्त करण्यासाठी मोहीम राबवून शासनामार्फत शौचालय अनुदान देऊन गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून गावे हागणदारीमुक्त केली त्या नंतर लाभार्थी शौचालय वापरतात की नाही ना शासन याकडे लक्ष देत आहे ना लाभार्थी याचा वापर जबाबदारीने करीत आहे त्यामुळे अनेक गावखेड्याचे प्रवेशद्वार घाणीच्या विळख्यात सापडत असून टमरेल बहाद्दर घरात शौचालय असतांना त्याचा वापर न करता उघड्यावर जात असून याला गुड मॉर्निग पथक कार्यान्वित करून टमरेल बहाद्दर यांना लगाम लावण्याची गरज असतांना पंचायत समिती देऊळगाव राजा ने वेळीच दखल घेऊन ९जून रोजी पथक नियुक्ती करण्यात आली असून पथक धीम्या गतीने गुड मॉर्निग म्हणत असतांना ६४गावात एका वाहनाच्या भरवश्यावर कधी पोहचेल व पथकाची सारथी असलेली गाडी इन्शुरन्स अभावी चाचपडत असून गुड मॉर्निग पथकला सुद्दा मरगळ आली असून पथकाने कार्यान्वित राहून एका गाडीच्या भरवश्यावर ६४गावात कधी जावे व त्यात सहा टीम कश्या पोहचतील व गाडीचा इन्शुरन्स कधी निघेल व पंचायत समिती कडून पथक गावा गावात कधी गेले ही माहिती कुठल्याच एका अधिकाऱ्याने न देता दुसऱ्याचे नाव सांगून प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन तश्या सूचना गटविकास अधिकारी यांना देण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत असताना पावसाळा तोंडावर आला असतांना साथ रोग डोखे वर काढणार नाही यासाठी तातडीने गुड मॉर्निंग पथकला आलेली मरगळ झटकून नव्या जोमाने कार्यान्वित करण्यात येऊन गावोगावी जाऊन टमरेल बहाद्दर यांना लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

शासनाकडून बेस लाईन नुसार लाभार्थी यांना शौचालय बांधकाम केल्या नंतर त्याला अनुदान सुद्दा देण्यात आले त्यानंतर पंचायत समिती नुसार गाव तालुका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला व त्या ग्रामपंचायत सरपंच सचिव यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व गावांच्या दर्शनी भागात गाव हागणदारी मुक्त असल्याचे फलक सुद्दा लावण्यात आले .

देऊळगाव राजा तालुक्यात गुड मॉर्निंगचे सहा पथके कार्यरत असुन कर्मचारी खाजगी वाहनाने गावांना भेटी देत असुन आठ दिवसात गिरोली व वाकी या गावांना भेटी दिल्या आहेत.

COMMENTS