Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थिनींच्या सरंक्षणासाठी सर्व शाळांना मिळणार होमगार्ड

म्हसवड / वार्ताहर : सध्या सर्वच शाळा परीसरात रोडरोमिओनी धुमाकूळ घातला असून या रोडरोमिओच्या धास्तीने पालकांची व शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांची डोक

त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रातील घटना लाजिरवाणी : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री
पळशी-सिध्देश्‍वर कुरोली रस्ता खुला करण्याची मागणी; रस्त्यात चरी खणल्याने लोकांची गैरसोय; न्याय देण्याची मागणी
फलटण तालुक्यात बैलगाड्यांच्या शर्यतीचा ट्रॅक पोलिसांकडून जमिनदोस्त

म्हसवड / वार्ताहर : सध्या सर्वच शाळा परीसरात रोडरोमिओनी धुमाकूळ घातला असून या रोडरोमिओच्या धास्तीने पालकांची व शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. रोडरोमिओंच्या त्रासामुळे अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागले आहे. अनेक पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवायला तयार नाही. त्यामुळे शिक्षण शिकायची इच्छा असताना मुलींना शिक्षण सोडून घरी बसावे लागत आहे. मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढत चालल्या असून त्यातून मुलांच्या मारमार्‍या पालकांची भांडणे यांचे प्रमाण वाढले आहे. बर्‍याच शाळांवर पोलीस अशा रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी सकाळ संध्याकाळ गस्त घालत असतातच पोलिसांच्या धाकामुळे त्यांच्यावर वचक बसला असला तरी व दामिनी पथकामुळे मुलींची हिंमत वाढवण्याचा प्रयत्न झाला असला तरी बर्‍याच मुली रोडरोमिओ पासून होणार्‍या त्रासाबद्दल घरी सांगत नाहीत. पोलिसांनी दिलेल्या नंबरवर फोन करुन तक्रार करत नाही, कारण असे काही केले तर आपलीच बदनामी होऊन वडील आपली शाळा बंद करतील, या भीतीमुळे त्या गप्प राहतात.
अशा शाळेभोवती शाळा भरताना व शाळा सुटताना फिरणार्‍या रोडरोमिओपासून सरंक्षण करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थीनींच्या सुरक्षितेसाठी शाळा सुरु होण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळात होमगार्ड सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे पत्र सर्व शाळांना पाठवून माहिती मागवण्यात आली आहे. या निर्णयाचे पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

COMMENTS