Homeताज्या बातम्या

चहा विक्री करणार्‍या धनराज दिवटे यांची कन्या प्रितीची निलसॉफ्ट कंपनीत इंजिनिअर पदावर निवडमहाराणी ताराबाई विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा पालकांसह सत्कार

वडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. प्रिती धनराज दिवटे हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या

‘जीपॅट’ स्पर्धेत संजीवनी बी. फार्मसीचे यश 
‘सनराईज’चा बारावीचा १०० टक्के निकाल
बी.फार्मसी कॉलेज व युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्नग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध


वडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. प्रिती धनराज दिवटे हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करत शासकीय अभियांत्रिकी संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तिची निवड निलसॉफ्ट या नामांकित कंपनीमध्ये इंजिनिअर पदावर झाली आहे. तिच्या या यशाबद्दल महाराणी ताराबाई विद्यालयात तिचा पालकांसह गुणगौरव करण्यात आला.
दि. 29 जून 2026 रोजी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्या श्रीमती शोभाताई आंधळे/डोईफोडे मॅडम, उपप्राचार्य मस्के सर, पर्यवेक्षक धाईतिडक सर तसेच अर्थ विभाग प्रमुख श्री. डोईफोडे सर यांच्या हस्ते कु. प्रिती दिवटे हिचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला. वडवणी शहरात छोटेसे चहाचे हॉटेल चालवून उदरनिर्वाह करणारे धनराज दिवटे यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण केले. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत प्रितीने कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सातत्याच्या जोरावर अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. तिचे यश हे ग्रामीण भागातील तसेच सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. सत्काराला उत्तर देताना कु. प्रिती दिवटे म्हणाली, सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण करून निलसॉफ्टसारख्या नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे मार्गदर्शन घेऊन सातत्याने अभ्यास व मेहनत केली तर निश्चितच यश मिळते. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रिती दिवटे हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS